Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.समिधा नटावदकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील रुग्णसेवेचा वसा कायम राहो : चंद्रकांत रघुवंशी

team by team
August 4, 2024
in राजकीय
0
डॉ.समिधा नटावदकर यांच्या माध्यमातून  जिल्ह्यातील रुग्णसेवेचा वसा कायम राहो : चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी

प्रत्येक माणूस भौतिक आणि आधुनिक सुविधा प्राप्तीसाठी धावत असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि गरजू रुग्णांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून डॉ. समिधा नटावदकर वैद्यकीय क्षेत्राचा वसा कायम राखतील. तसेच रेवा फाउंडेशनच्या आरोग्य कार्डचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना होईल असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

येथील रेवा फाउंडेशनतर्फे एक दिवसीय विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी चंद्रकांत रघुवंशी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, माजी जि.प उपाध्यक्ष जयपालसिंह रावल जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, डॉ.स्वागत शाह, डॉ कुणाल फुले ,डॉ कपिल दुसेजा ,डॉ. निलेश वळवी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

रेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. समिधा नटावदकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यात सिकल सेल ॲनिमिया कुपोषण तसेच किशोरवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण आरोग्य विषयक अनास्था अंधश्रद्धा अशा अनेक समस्या असून या सर्व गरजू रुग्णांसाठी रेवा फाउंडेशन लवकरच रेवा हेल्थ कार्ड आणणार आहे. या कार्डच्या माध्यमातून रुग्णांना लाभ होणार आहे.रविवारी झालेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी डॉ. कुणाल फुले, डॉ स्नेहल फुले,डॉ. कपिल दुसेजा, डॉ. अभिजीत महाजन, डॉ. खुशाल सिंग राजपूत, डॉ. खुशबू वाघ, डॉ दीव्या बागुल ,डॉ. नम्रता बोराडे, डॉ. फुलसिंग पाडवी, डॉ. धनश्री बर्डे, डॉ. निलेश शर्मा, यांची टीम उपस्थित होती. या शिबिरा साठी सेवा जनरल हॉस्पिटल, सेवांकुर टीम तसेच मेडिकल कॉलेज , सिव्हिल हॉस्पिटल स्टाफ यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले तर आभार प्रशांत पवार यांनी मानले. आरोग्य शिबीर यशस्वीतेसाठी रेवा फाउंडेशन अध्यक्षा समिधा नटावदकर, रोहन नटावदकर, प्रशांत पवार, संचालक अंजली तडवी, हेमांगी वसावे, तेजल वसावे, देवयानी वळवी, निखिल पाटोळे , वेदांत कुमावत, अक्षय पाटील , हर्षदीप पिंपळे , आकाश मेने ,राजेश बैसाने ,मोहन धोणे यांनी परिश्रम घेतले.

रेवा फाउंडेशनतर्फे आयोजित विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे 364 रुग्णांची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय सेवा ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात 50 दात्यांनी रक्तदान केले.

नंदुरबार येथील रेवा फाउंडेशनतर्फेआयोजित
आरोग्य शिबिरासाठी नंदुरबार लोकसभेचे खासदार एडवोकेट गोवाल पाडवी, अक्कलकुव्याचे आमदार एडवोकेट के. सी. पाडवी, तळोद्याचे आमदार राजेश पाडवी, नवापूरचे आमदार शिरीष नाईक या सर्व लोकप्रतिनिधींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठविले.अशी माहिती रेवा फाउंडेशनतर्फे देण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

जल जीवन मिशन योजनेतील दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा करणार; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या गंभीर इशारा

Next Post

उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी ‘मैत्री कक्ष’ सक्षमीकरण : उन्मेष महाजन

Next Post
उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी ‘मैत्री कक्ष’ सक्षमीकरण : उन्मेष महाजन

उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी ‘मैत्री कक्ष’ सक्षमीकरण : उन्मेष महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add