नंदुरबार l प्रतिनिधी
एस.ए.मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,नंदुरबार येथे जिल्हा विधि सेवा व एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय ज्ञानेश्वर हर्ने, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आर.बी.पाटील, नगरपालिका शिक्षण प्रशासकीय अधिकारी भावेश सोनवणे, लायन्स क्लब जिल्हा समन्वयक डॉ.सौ तेजल चौधरी, युवारंग ङ्गाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लूळे, शाळेच्या प्राचार्य सौ नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक व्ही.आर.पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक सी.पी. बोरसे,ज्येष्ठ शिक्षक ए. आर.गर्गे आदी उपस्थित होते,कार्यक्रमाचा सुरुवातीस सावित्रीबाई ङ्गुले त्यांना अभिवादन करण्यात आले.यानंतर उपस्थित मान्यवरांचे सत्कार शाळेच्या प्राचार्या सौ .नूतन वर्षा वळवी यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी प्रास्ताविक सादर करताना प्रा. सुनीता शिंदे यांनी बेटी बचाव बेटी पढाओ या विषयावर विद्यार्थ्यांसमोर माहिती प्रस्तुत केली. यानंतर शाळेतील शिक्षिकांनी बेटी हू मै बेटी तारा बनूंगी हे गीत सादर केले यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थीनी कल्याणी बडगुजर हिने बेटी बचाव या विषयावर आपले मनोगत सादर केले.यावेळी ज्ञानेश्वर हर्ने यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचारा वर कायदेविषयक सल्ले व मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शन चे ङ्गित कापून उद्घाटन करण्यात आले यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, व रांगोळी स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना जिल्हा विधी प्राधिकरणामार्ङ्गत बक्षीस वितरण करण्यात आले त्यानंतर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्य सौ. नूतनवर्षा वळवी,पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, ज्येष्ठ शिक्षक ए.आर.गर्गे यांच्याकडून गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बेटी बचाव या थीम डान्सचे सादरीकरण करण्यात आले त्यानंतर युवारंग ङ्गाउंडेशन व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पथनाट्याचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन प्रा. सुनीता शिंदे तर आभार प्रा.छाया बच्छाव यांनी केले.








