Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा- 2 अभियानास 5 ऑगस्ट पासून सुरुवात

team by team
August 2, 2024
in शैक्षणिक
0
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा- 2 अभियानास 5 ऑगस्ट पासून सुरुवात

नंदुरबार  l प्रतिनिधी

2023-24 मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही झाली. या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रक्कमेच्या स्वरुपात पारितोषिक देण्यात आली. आता 2024-25 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा दुसरा टप्पा काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” टप्पा-2 अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात आली आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शासनाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोणातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक आदी घटकांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा-2 अभियानाच्या पूर्वतयारीसाठी 29 जुलै 2024 ते 04 ऑगष्ट 2024 हा कालावधी निश्चित करण्यात आला असून सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी. 05 ऑगष्ट,2024 ते 4 सप्टेंबर,2024 हा अभियानाचा कालावधी आहे. या अभियानाचा कालावधी एक महिना आहे.

या अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधांसाठी 33 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी 74 गुण, शैक्षणिक संपादणूकसाठी 43 गुण असे 150 गुणांच्या आधारे सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीम. वंदना वळवी शिक्षणाधिकारी (प्राथमिक),श्री.निलेश लोहकरे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक),श्री.प्रविण अहिरे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व डॉ. युनूस पठाण उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

अवघ्या दोन वर्षात दिले तेवढे लाभ आमच्या विरोधकांनी मागच्या तीस वर्षात दिलेत का? : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले, शहादा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add