नंदुरबार l प्रतिनिधी
शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० निमित्ताने शिक्षण सप्ताह दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. आज सहावा दिवसानिमित्ताने वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भालेर येथे शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.त्या अंतर्गत विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहेत.सकाळी शाळेच्या प्रांगणातून सजवलेल्या वृक्षांची रोप ठेवून वृक्ष दिंडीला मुख्याध्यापक आर.एच.बागुल यांनी खांद्यावरती घेऊन वृक्ष दिंडीला प्रत्यक्ष सुरुवात केली.या वृक्ष दिंडीत संतांचे सजीव देखावे सहभागी करून घेतले होते.संतांचे सजीव देखावे हे बैलगाडी वरती बसून त्यांना भालेर,नगाव व तिसी या तिन्ही गावातून वृक्षदिंडी बरोबर मिरवण्यात आले.”झाडे लावा झाडे जगवा”,”जेथे झाडे उदंड,तेथे पाऊस प्रचंड” अशा घोषवाक्यसह वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशी भजनासह तिन्ही गावांमध्ये वृक्ष लागवडीसाठी व त्यांचे संवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली.
मुख्य चौकांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा असलेला रिंगण सोहळा,फुगडी खेळ व वृक्ष लागवड जनजागृतीसाठी पथनाट्य विद्यार्थ्यांनी साजरा केला.विद्यार्थिनींनी नऊवारी साडी व विद्यार्थ्यांनी टोपी सदरा व धोती असा टाळ मृदंग सह महाराष्ट्रीयन वारकरी परंपरा असलेला पारंपारिक पेहराव परीधारण केला होता. विद्यार्थ्यांनी गावकरी व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.या वृक्षदिंडी मध्ये विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षक,शिक्षक इतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.