नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सुरत-भुसावळ मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. या मार्गावरून धावणाऱ्या सात गाड्या वळविण्यात आल्या आहेत. तर दोन गाड्या रद्द झाले आहे. नंदुरबार रेल्वे स्थानकावर सकाळी साडेपाच वाजेपासून अमदाबाद बरोनी एक्सप्रेस थांबली असून सात तासापासून प्रवासी ताटकळत थांबले आहेत.
चिंचपाडा कोळदा दरम्यान 70 ई 2 रेल्वे फाटक वरील रेल्वे रुळावर पाणी साचले. तसेच ओवर ब्रिज बनवण्यात एत होता.त्या ठिकाणी बाजूला असलेली माती रेल्वे रुळावर पसरल्याने सकाळी साडेपाच वाजेपासून सुरत भुसावळ दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या थांबवण्यात आल्या. तर 12656 चेन्नई ते अहमदाबाद एक्सप्रेस भुसावळ खंडवा मार्गे, 07055 काचीगुडा ते हिसार ही एक्सप्रेस इटारसी भोपाल मार्गे, 12834 हावडा ते आमदाबाद ही एक्सप्रेस रतलाम मार्गे वळवण्यात आले आहे.
15068 बांद्रा ते गोरखपुर, 12833 आमदाबाद ते हावडा, 19483 आमदाबाद ते बरोनी, 20824 अजमेर ते पुरी या एक्सप्रेस भरूच मार्गे वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान उद्घाटन नंदुरबार आणि नंदुरबार ते उधना जाणारी मेमो रद्द करण्यात आली आहे.
*7 तासापासून प्रवासी ताटकळत*
नंदुरबार नवापूर दरम्यान रेल्वे रुळावर माती तसेच पाणी साचल्याने सुरत भुसावळ दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. नंदुरबार रेल्वे स्थानकात 19483 क्रमांकाचे आमदाबाद बरोनी एक्सप्रेस सकाळी साडेपाच वाजेपासून नंदुरबार रेल्वे स्थानकावर उभी आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.