नंदुरबार l प्रतिनिधी
अंगणवाडी बांधकामाचा बिलाच्या रक्कमेसाठी 26 हजाराची लाच स्विकारतांना अक्कलकुवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीसह सहाय्यक लेखाधिकारीला काल 25 जुलै रोजी अक्कलकुवा कार्यालयातून प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे..
तक्रारदाराने अक्कलकुवा व डाब ग्रामपंचायत अंतर्गत तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले होते. बांधकाम बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरवा केला होता. परंतु तक्रारदार यांच्या बिलाची रक्कम खात्यावर वर्ग झाली नाही. तक्रारदाराकडून बिल काढून देण्यासाठी 26 हजाराची मागणी केली. तक्रारदाराकडून 16 हजार रुपये स्विकारतांना अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे तसेच सहाय्यक लेखाधिकारी रविंद्र सुकदेव लाडे यांना आठ हजार रुपयाची रोकड घेतांना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक राकेश चौधरी यांनी सापळा लावून दोघांना रंगेहाथ पकडले.