नंदुरबार l प्रतिनिधी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे कारगिल विजय दिवसानिमित्त एक पेड शहीद के नाम उपक्रमांतर्गत 1001 वृक्षांची लागवड उमर्दे ता. नंदुरबार येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालाच्या नवीन इमारतीच्या जागी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.कारगिल विजय दिवस मनात असताना कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या श्रद्धांजली म्हणून एक पेड शहीद के नाम हा कार्यक्रम नंदुरबार येथील माजी सैनिक यांना बोलवून त्यांच्या हाताने श्रद्धांजली म्हणून एक वृक्ष लावण्यात आले.
आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत चेतवण्यासाठी कारगिल विजय दिवसाचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या श्रद्धांजली म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे 1001 वृक्षारोपण करण्यात आले.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमर्दे ता. नंदुरबार येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालाच्या नवीन इमारतीच्या जागी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली.यावेळी सहाय्यक वाहक निरीक्षक गिरीश पाटील, मोटार वाहन निरीक्षक मुकेश देवरे ( माजी सैनिक), वनपाल पी.जी. देवरे, के.के.पावरा,किरण पाटील, माजी सैनिक अरविंद निकम, संजय सैंदाणे, सुकलाल माळी, नरेंद्र बागुल, मोटर वाहन चालक मालक संघटनेचे संजय पवार, उल्हास वाणी, लोटन पाटील, बापू महाजन, भूपेंद्र रघुवंशी, विजय बागडे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी दिलीप शिरसाठ, प्रकाश खरात, दत्ता देवकाते, जितेंद्र देवकर आदी उपस्थित होते.