तळोदा l प्रतिनिधी-
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा मिशन कवच कुंडल अभियाना अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसात साधारण 21 हजार जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य सूत्रांनी दिली.आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रयत्नातून विक्रमी लसीकरण झाले आहे.दरम्यान आरोग्य विभागाचे उप संचालकांनी तळोदा येथील लसीकरण केंद्राला भेट देवून पाहणी केली. जिल्ह्यात लसीकरणाच् उत्कृष्ठ कामकाज होत असल्याने समाधान व्यक्त केले. कोरोनाची संभाव्य तिसरी लाटेचा धोका लक्षात घेवून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मिशन कवच कुंडल हे अभियान गेल्या दोन दिवसंपासून सुरू केले आहे.साहजिकच लसीकरणालही गती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसिंनची मोठ्या प्रमाणात उपलब्धता लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग देखील पुढे सरसावला आहे.त्यामुळे करणाचाऱ्यानी सुध्दा लसीकरणाच्या वेग वाढविला आहे.प्रत्येक तालुक्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.अठरा वर्षांवरील नागरीक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत.एवढेच नव्हे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात देखील मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे.दोनच दिवसात संपूर्ण जिल्ह्यातून साधारण 21 हजार जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण यांनी सांगितले.आरोग्य विभागाचा या लसीकरण मोहिमेस सर्व राजकीय पक्षांचे लोक प्रतिनिधी सहभागी होवून नागरिकांना आवाहन केले आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे पुणे येथील उपसंचालक डॉ. डी.एन. पाटील यांनी तळोदा येथील लसीकरण केंद्राला भेट देवून पाहणी केली.त्यांनी जिल्ह्यातील लसीकरणाची माहिती घेतली.अगदी दुर्गम भागातही सुरळीत लसीकरणाची काम होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी विडीओ कॉन्फरनसद्वारे संवाद साधून सूचना दिल्यात.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ विशाल चौधरी, डॉ. गाडेकर, डॉ. कृष्णा पावरा व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.