Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी गावागावात घेणार शिबिरे; संकल्प मेळाव्यात डॉ. हिना गावित यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

team by team
July 13, 2024
in राजकीय
0
लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी गावागावात घेणार शिबिरे; संकल्प मेळाव्यात डॉ. हिना गावित यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारने लागू केलेली ‘लाडकी बहिण’ योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून चांगली अंमलबजावणी व्हावी म्हणून स्थानिक आमदारांच्या देखरेखित त्याचे लाभ देण्याचा निर्णय सरकारने केला आहे त्यानुसार नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील सर्व गावांमधील महिलांना मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नाने लाभ मिळवून दिले जाणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या मा.खासदार डॉ.हिना गावित यांनी संकल्प मेळाव्यात बोलताना दिली.

प्रत्येक गावातील प्रत्येक महिलेला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावागावात अर्ज भरून घेण्यासाठी शिबिरे घेतली जाणार आहेत. त्या शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा आणि मुदतीत अर्ज भरावे; असे आवाहन देखील डॉ.हिना गावित यांनी केले.

जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत दिनांक 12 जुलै 2024 रोजी बाबा रिसॉर्ट च्या सभागृहात हा मेळावा पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्यासह भाजपाचे तालुका अध्यक्ष जे एन पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर पाटील, श्याम मराठे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल, विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर, संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, प्रकाश गावित आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल यांनी मेळाव्यात बोलताना योजनेची अधिक माहिती दिली. मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेची मुदत अद्याप पंधरा दिवस आहे. याच्या आधी लागू असलेल्या सर्व अटी शिथिल करण्यात आल्या असून फक्त रहिवास दाखला आधार कार्ड वगैरे चारच प्रकारचे कागद जोडणे आता आवश्यक केले आहे. महिलांना सहकार्य म्हणून प्रत्येक गावातील कार्यकर्ता आपापल्या मोबाईल वरून ऑनलाइन अर्ज भरून देऊ शकतो तेवढे सहकार्य सर्व कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन देखील जयस्वाल यांनी याप्रसंगी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपाचे चारही आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात निवडून आणणार; डॉ. हिना गावित

Next Post

राज्यात आपत्कालीन फायर बाईकचे प्रथमच नंदुरबारमध्ये वितरण

Next Post
राज्यात आपत्कालीन फायर बाईकचे प्रथमच नंदुरबारमध्ये वितरण

राज्यात आपत्कालीन फायर बाईकचे प्रथमच नंदुरबारमध्ये वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add