नंदुरबार l प्रतिनिधी
ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिल ची बैठक नियमानुसार घेण्यात यावी या सह विविध मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांचा वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळ धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
आज 9 दिवस होण्यात आले परंतु शासनाच्या वतीने काही सकारात्मक निर्णय देण्यात येत नसल्याचे चित्र आहे. आज पालकमंत्री ना अनिल पाटील यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन मागण्या शासन स्तरावर आपल्या मागण्या पूर्ण करतोअसे सांगितले. तसेच आंदोलकांना आंदोलन माघे घेण्याची विनंती केली परंतु आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे भरत गावित यांनी सांगितले.
आदिवासी ट्रायबल एडवायझरी कौन्सिलचा बैठकीची तारीख निश्चित करण्यात यावी .तसेच आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटच्या कायदा पारीत करावा, पेसा कायद्याची काटेकोर रित्या शासन स्तरावर अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचीची विना विलंब अंमलबजावणी करण्यात यावी .
या प्रमुख मागण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित याच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला जिल्ह्यातील जवळपास 15 आदिवासी संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.यावेळी के.टी.गावित ,हिरामण पाडवी, वैशाली चौधरी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे कमलेश चौधरी ,मधुकर पाटील तसेच आंदोलक उपस्थित होते.