नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयात महिलांची दररोज गर्दी होत आहे. फॉर्म भरून घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकताच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. पात्र लाभार्थी खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होणार आहेत. सरकारची अत्यंत महत्त्वकांशी योजना असल्याने फॉर्म भरून घेण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयात मोफत फॉर्म भरून घेण्यासाठी दररोज महिलांची गर्दी उसळत आहे.
सकाळी ८ वाजेपासूनच महिला फॉर्म भरण्यासाठी येत आहेत.दिवसभरातून काही हजारांवर फार्म भरून घेण्यात येत आहेत. यावेळी उपस्थित महिलांना चहापानाचे देखील वाटप करण्यात येत आहे. नंदुरबार शहरासह ग्रामीण भागातील महिला दररोज हजेरी लावत आहेत.