नंदुरबार | प्रतिनिधी
सुनेला नांदण्यास येवू नसल्याची कुरापत काढुन पतीसह दोन्ही पत्नींना काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना पिंपळा येथे घडली. याप्रकरणी चौघांविरूध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर तालुक्यातील पिंपळा येथील विक्रम इसर्या गावीत यांच्यासह त्यांच्या दोन्ही पत्नींना लाठयाकाठयांनी मारहाण करण्यात आली. सुनेला नांदण्यास येवू देत नसल्याची कुरापत काढुन वाद झाला. या वादातून चौघांनी विक्रम गावीतसह पत्नी रशिदा विक्रम गावीत, पत्नी भानुबाई विक्रम गावीत यांना मारहाण करून जखमी केले. याबाबत विक्रम इसर्या गावीत यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काशा हिरामण पाडवी, रेवलीबाई सुनिल गावीत, हिरामण पोसल्या गावीत, सुमीबाई काशिराम गावीत या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. गावीत करीत आहेत.