नंदुरबार l प्रतिनिधी
पंचायत समितीच्या उपसभापतीपदी वाघाळे गणाचे सदस्य संतोष साबळे यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी केली.
नंदुरबार पंचायत समितीत सर्वांना संधी मिळावी यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सभापती व उपसभापती पदाच्या फॉर्मुला ठरवलेला आहे. मावळते उपसभापती तेजस पवार यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी मागील काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. त्यानंतर मंगळवार (दि.24 जून) रोजी पंचायत समितीच्या सभागृहात उपसभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी विहित मुदतीत उपसभापती पदासाठी वाघाळे गणाचे सदस्य संतोष साबळे यांनी नामांकन अर्ज पिठाचे अधिकारी तथा तहसीलदार नितीन गर्जे यांना सादर केला. दुपारी 3 वाजता निवड प्रक्रिया घेण्यात आली. संतोष साबळे यांच्या एकमेव अर्ज आल्याने पिठाचे अधिकारी गर्जे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी नवनियुक्त उपसभापती संतोष साबळे यांच्या सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,सभापती अंजना वसावे,जि.प सदस्य विजयसिंह पराडके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,जि.प सदस्य देवमन पवार,जि.प माजी अध्यक्ष रमेश गावित,बाजार समिती संचालक किशोर पाटील,नवीन बिर्ला,शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे,माजी पंचायत समिती सदस्य सुनील वसावे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पवार यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते