Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना

team by team
June 24, 2024
in राज्य
0
प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना

जळगाव  l

 महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांना सौर ऊर्जा निर्मितीद्वारे मोफत वीज मिळावी यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तीन किलोवॅटपर्यंतचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी केंद्र सरकारकडून मिळते. त्यासाठी केंद्रीय मंत्रालयातर्फे वेबसाईट तयार करण्यात आली असून त्यावर नोंदणी करावी लागते. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन (आरईसी) ही नोडल एजन्सी आहे.

केंद्र सरकारने योजना घोषित केल्यानंतर तिला भरघोस प्रतिसाद मिळाला. राज्यात आतापर्यंत 1,73,272 ग्राहकांनी नोंदणी केलेली आहे.

मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्यानंतर गेल्या काही दिवसात योजनेच्या वेबसाईटबाबत ग्राहकांकडून काही तक्रारी येत आहेत.

प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेच्या वेबसाईटबाबत वीज ग्राहकांना आलेल्या अडचणींची दखल केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय मंत्रालयाने घेतली आहे. या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयातर्फे तज्ञांची तुकडी रविवारी काम सुरू करत आहे.

वेबसाईटबाबतच्या अडचणींची माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवारी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे दिली. यावेळी नागपूरमध्ये रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या एजन्सीचे प्रतिनिधीही उपलब्ध होते.

ग्राहकांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिल्यानंतर केंद्रीय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली व समस्या सोडविण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची तुकडी मुंबईत पाठविण्याचे मान्य केले.

महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी केंद्रीय तुकडीला वेबसाईटच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करेल, असेही व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ठरले.

बातमी शेअर करा
Previous Post

वाघाळे गणाचे संतोष साबळेंची पंचायत समिती उपसभापतीपदी वर्णी

Next Post

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीतील जाचक अटी त्वरित रद्दबातल करण्याची मागणी, नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रशासनाला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add