नंदुरबार l प्रतिनिधी
स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनी कडून आरोग्य विमा पॉलिसी नंदुरबार व खांडबारा येथील रहिवासांनी काढला होता. कोरोना काळात त्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांनी कंपनीकडे उपचार करता लागणारा खर्च कंपनीकडे मागणी केली कंपनीने उपचाराचा खर्च देण्याचे नाकारले. या रहिवाशांनी नंदुरबार येथील ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ग्राहक मंचाने संबंधित कंपनीला दणका देत. ग्राहकांना खर्चासह भरपाई देण्याचे आदेश दिले.
नंदुरबार येथील रहिवासी उमेश भगवानसिंग राजपूत यांनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून आरोग्य विमा पॉलिसी काढलेली होती. सदर पॉलिसीच्या कालावधीत तक्रारदार यांना कोरोना आजार झाला. उपचाराकरता त्यांना लागणाऱ्या खर्चाची मागणी ज्यावेळी त्यांनी विमा कंपनीकडे केली तेव्हा विमा कंपनीने सदरहू खर्चाची रक्कम देण्याचे नाकारले. सबब उमेश राजपूत यांनी नंदुरबार ग्राहक आयोग येथे विमा कंपनी तक्रार दाखल केली.
दाखल तक्रार, इतर कागदपत्र, तज्ञ वकिलांचा युक्तिवाद तसेच दाखल न्यायनिवाडे या सर्वांचे सखोल अवलोकन करून ग्राहक आयोगाचे अध्यक्ष डी. एस. प्रसन्ना, मोहन एस बोडस, श्रीमती एस. एस. पवार यांनी सदरची तक्रार मंजूर करून विमा कंपनीने तक्रारदार यांना उपचाराच्या खर्चाची रक्कम एक लाख 19 हजार 749 रुपये व शारीरिक व मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये व तक्रार अर्जाचा खर्च 5000 रुपये तसेच दि. 25 ऑक्टोबर 2021 पासून 45 दिवसात नऊ टक्के व्याजदराने संपूर्ण रक्कम तक्रारदारास देऊन होईपर्यंत ग्राहक आयोगाने पारित केला आहे.
दुसऱ्या घटनेत नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील रहिवासी नंदकिशोर जगन्नाथ अग्रवाल व सीताबाई नंदकिशोर अग्रवाल या व्यापारी दाम्पत्यांनी स्टार हेल्थ एंड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचे कडून कोरोना कवच ही पॉलिसी काढलेली होती सदर पॉलिसीच्या कालावधीत नंदकिशोर अग्रवाल यांना कोविड -19 आजार झाला. उपचाराकरिता त्यांना लागलेल्या खर्चाची मागणी ज्यावेळी त्यांनी विमा कंपनीकडे केली तेव्हा विमा कंपनीने सदरहू खर्चाची रक्कम देण्याचे नाकारले.
अखेर व्यापारी नंदकिशोर अग्रवाल यांनी नंदुरबार ग्राहक आयोग यांचे विमा कंपनीविरुद्ध ॲड. निलेश देसाई यांचे मार्फत तक्रार दाखल केली. दाखल तक्रार शपथपत्र इतर कागदपत्र वकिलांचा युक्तिवाद तसेच दाखल न्यायनिवाडे या सर्वांचे सखोल अवलंबून करून ग्राहक आयोगाचे अध्यक्ष डीएम प्रसन्ना तसेच सदस्य मोहन येसबोडस श्रीमती एस एस पवार यांनी सदरची तक्रार मंजूर करून विमा कंपनीने तक्रारदार यांना उपचाराच्या खर्चाची रक्कम एक लाख आठ हजार 586 रुपये तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये व तक्रार अर्जाचा खर्च 5000 रुपये दिनांक 18 डिसेंबर 2020 पासून 45 दिवसात नऊ टक्के व्याजदराने संपूर्ण रक्कम तक्रारदारास द्यावी असा आदेश पारित केला.