नंदुरबार l प्रतिनिधी
वसंतराव नाईक अधिकारी, कर्मचारी संघटनेतर्फे दरवर्षी बंजारा समाजाचा गुणवंतांचा सत्कार करण्यात येतो. त्यानिमित्त सर्वानुमते कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी 23 जून रविवार रोजी सकाळी दहा वाजेला नंदुरबार येथील दंडपाणेश्वर मंदिराच्या परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील जे विद्यार्थी उत्कृष्ट गुण संपादन करून दहावी, बारावी, डिप्लोमा , डिग्री इंजिनीअर्स, डॉक्टर्स, एलएलबी , या सर्व क्षेत्रातून उत्तीर्ण झालेत त्या विद्यार्थ्यांना समाजाकडून प्रेरणा मिळावी पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आपण सालावादाप्रमाणे याही वर्षी जिल्हास्तरीय गुणगौरवाचा, सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी पदाधिकारी, पदोन्नती मिळालेल्या कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तथा पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करणार आहोत यासाठी सर्व बंजारा कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी , उद्योजक, व्यापारी, कुशल कारागीर सामाजिक कार्यकर्ते यांची दिनांक 23 जून 2024 वार रविवार सकाळी ठिक 10 वाजता दंडपाणेश्वर मंदिराच्या परिसरात नंदुरबार येथे बैठक लावण्यात आलेली असुन सर्वानुमते आयोजन व नियोजन करण्यात येणार आहे .
तसेच 2024 – 25 या शैक्षणिक वर्षात आपल्या संघटनेकडून विविध कार्यक्रमाचे नियोजन करावयाचे आहेत. सामाजिक कार्य ,वृक्षरोपण, जल है तो कल है पाणी वाचवा पाणी आडवा अभियान विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट प्रगती व्हावी यासाठी तज्ञ मार्गदर्शक बोलावून त्यांना उद्बोधन करण्यासंबंधी व आपल्या समाजाची कशी प्रगती होईल समाज कसा पुढे येईल यासाठी सर्व ध्येय धोरण निश्चित करण्यात येणार आहे. म्हणून सर्व समाज बंधू-भगिनींनी 23 तारखेला रविवारी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.