Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहीद जवान वसावे यांच्या कुटुंबियांचे खासदार, आमदार यांच्या कडून सांत्वन

team by team
June 21, 2024
in राजकीय
0
शहीद जवान वसावे यांच्या कुटुंबियांचे खासदार, आमदार यांच्या कडून सांत्वन

नंदुरबार l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील घोडलेपाडा येथील वीरगती प्राप्त झालेल्या शहीद जवान मेजर रमेश वसावे यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित खासदार ॲड. गोवाल पाडवी व माजी मंत्री आमदार ॲड.के. सी. पाडवी यांनी नुकतीच भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. दरम्यान तत्पूर्वी आमदार राजेश पाडवी यांनीही भेट दिली.

घोडलेपाडा येथील भारतीय सैन्य दलातील सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेले जवान मेजर रमेश वसावे यांना राजस्थान मधील अजमेर जवळ वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्यावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.त्यांच्या मृत्युने त्यांचे कुटुंब अजूनही दुःखातून सावरलेले नाही. शहीद जवान मेजर रमेश वसावे यांच्या निवासस्थानी सांत्वनासाठी अनेक जण भेटी देत आहेत. नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी व माजी आदिवासी विकास मंत्री आमदार ऍड के. सी. पाडवी यांनी नुकतीच घोडलेपाडा येथे येवून शहीद जवान वसावे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी शहीद जवान रमेश वसावे यांच्या पत्नी, मुले, भाऊ, भगिनी,त्यांच्या मातोश्री यांचेशी चर्चा करून आस्थेवाईक पणाने विचारपूस केली. शासनाचे विविध लाभ, तसेच मुलांच्या शिक्षणाविषयी , पत्नीच्या नोकरीविषयी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, काँग्रस चे ज्येष्ठ नेते दिलीप नाईक, काँगेस चे तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, मंदाणे येथील सातपुडा उद्योग समूहाचे संचालक प्रकाश पवार उपस्थित होते.

*आमदार राजेश पाडवी यांचीही भेट*
आमदार राजेश पाडवी यांनी ही नुकतीच घोडलेपाडा येथे येवून शहीद जवान मेजर रमेश वसावे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांचे समवेत पंचायत समितीचे सदस्य श्रीराम पाटील हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

ई-केवायसी न झाल्यास रेशन होणार बंद, रास्तभाव दुकानामार्फत तेथील ई-पॉस मशीनद्वारे केले जाणार

Next Post

नंदुरबारच्या चिमुकल्या नारायणीने बुद्धिबळात पटकावले आशियाई अजिंक्यपद.. ८ वर्षांखालील मुलींच्या गटात जिंकले २ सुवर्णपदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add