नंदुरबार l प्रतिनिधी
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बुधवार 26 जून 2024 रोजी मतदान होत असल्याने मतदारांनी मतदार कसे करावे याबाबतची भारत निवडणूक आयोगाचे निर्देश मार्गदर्शनासाठी देण्यात आले असल्याचे सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
*शिक्षक मतदानसंघाच्या निवडणूकीसाठी मतदार कसे करावे..*
✅ मतदान करण्यासाठी मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केचपेनचाच वापर करावा. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपॉइंट पेन किंवा साहित्याचा वापर करुन नये.
✅मतदान पसंतीक्रमानुसार (Order of Preference) करावयाचे असल्याने मतदारांनी पहिल्या पसंतीच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात ‘1’ हा अंक लिहून मतदान करावे. ‘1’ हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा. यापुढील पसंतीक्रम जसे 2,3,4. नोंदविणे ऐच्छिक आहे.
✅ जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्या सर्वांचे संख्येइतके पसंतीक्रम मतदारास नोंदविता येतील.
✅मतपत्रिकेवर नमूद करावयाचा पसंतीक्रम केवळ अंकामध्ये व एकाच भाषेत देवनागरी, इंग्रजी, रोमन किंवा राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टामध्ये नमुद कोणतीही इतर भारतीय भाषेत नमूद करावा. जसे की, 1,2,3,4,5 किंवा 1,2,3,4,5 किंवा I,II,III,IV,V…
✅ पसंतीक्रम शब्दात लिहू नये जसे की, एक, दोन, तीन..इ.
✅ पसंतीच्या उमेदवारापुढे ‘✖️’ किंवा ‘✔️’ अशी खुण करू नये.
✅ मतपत्रिकेवर नाव, कोणताही शब्द किंवा कुठेही सही/अंगठा करु नये.
*असे केल्यास मतपत्रिका बाद ठरेल..*
✅ पसंती क्रम ‘1’ लिहीला नसेल.
✅‘1’ हा पसंतीक्रम एका पेक्षा जास्त उमेदवारास दिला असल्यास.
✅ पसंतीक्रम ‘1’ नक्की कोणत्या उमेदवारा आहे ? याचा बोध होत नसल्यास.
✅ पसंतीक्रम ‘1’ लिहिल्यानंतर त्याच उमेदवारासमोर 2.3.4.5. असे पसंतीक्रम लिहिल्यास.
✅ पसंतीक्रम एक, दोन, असा शब्दात लिहीला असल्यास.
✅ पसंतीक्रमाबरोबर इतर कुठल्यातरी प्रकारची खूण असणे. जसे की, सही करणे, नांव लिहणे, अंगठा देणे, ‘✖️’ किंवा ‘✔️’ इत्यादी ज्यामुळे उमेदवाराची ओळख पटेल.
✅ मतदान केंद्रावर पुरविलेल्या जांभळ्या रंगाच्या शाई व्यतिरिक्त इतर शाईने पसंतीक्रम लिहिल्यास.
✅ मतपत्रिकेवर पसंतीक्रम वेगवेगळ्या भाषेत लिहिल्यास जसे की 1,2,3 तसेच 1,2,3, IV.
जिल्ह्यातील शिक्षक मतदारांनी मतदानासाठी वरील सुचनाचे पालन करुन अधिकाधिक मतदान करावे, असेही आवाहन श्रीमती खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.