शहादा | प्रतिनिधी
शहादा – धडगांव रस्त्यावरील दरा फाट्याजवळ पोलीसांनी अवैध दारू विक्री वाहतुक करणार्या गाडीसह साडे सोळा लाखाचा मुद्देमाल जप्त केला असुन गाडीतुन तलवार ही जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी अज्ञात चालक फरार झाला.पोलीसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊ वाजता शहादा म्हसावद धडगांव रोडवरील दरा गावाचे पलिकडे अंदाजे ७०० मिटर अंतरावर सार्वजनिक जागी ११ लाख ३६ हजार ८०० रूपये किंमतीची दारू,व्हिस्की,५ लाख रूपये कींमतीची महेंद्रा बोलेरो गाडी असा एकूण १६ लाख,३६ हजार ८०० रूपयाचा माल म्हसावद पोलीसांनी पकडला आहे.यात मॅकडॉल्स नंबर-१ रिझर्व व्हिस्की कंपणीचे १८० एम.एल. क्वार्टरचे एकुण ८० बॉक्स, एका बॉक्स मध्ये ४८ नग काचेच्या सिलबंद वाटल्या अशा एकुण ८० वॉक्समधील १८० एम. एल. च्या ३८४० सिलबंद काचेच्या बाटल्या एका बाटलीची किमंत २३५ रु. प्रमाणे ९ लाख २ हजार चारशे रूपये, मॅकडॉल्स नंबर-१ रिझर्व व्हिस्की कंपणीचे ७५० एम.एल.चे एकुण २० बॉक्स, एका बॉक्स मध्ये १२ नग काचेच्या सिलबंद बाटल्या अशा एकुण २० बॉक्समधील ७५० एम.एल. च्या २४० सिलबंद काचेच्या बाटल्या एका बाटलीची किमंत ९६० रु.प्रमाणे २ लाख ३० हजार चारशे रुपये,४ हजार रूपये किंमतीची एक लोखंडी धारदार तलवार, मुठीसह ३२.५ इंच लांब व मुठीपासुन २८ इंच लांब मध्य भागी १ इंच रुंद असलेली पितळी मुठीची लांबी ४.५ इंच लांब अर्ध चंद्रकार धारदार आरोपी ड्रायव्हर सिटच्या मागे मिळुन आली. महिंद्रा बोलेरो कंपणीची पांढर्या रंगाची मालवाहु पिक अप निळ्या ताडपत्रीसह (क्र.एम.एच. ०४ एफ. जे. ६८६७) असा असलेली ५ लाख रूपये किंमतीची असा एकूण १६,३६,८०० चा माल पकडण्यात आला. अज्ञात वाहन चालक याने वरील वर्णनाचा व किमंतीचा प्रतिबंधीत गुन्ह्याचा माल विना पास परमिट गैर कायदा खेतिया म्हसावद गावाकडुन धडगांव गावाकडे वाहतुक करतांना व पोलीस रेड आल्याचे पाहुन वाहन सोडुन पळुन गेला म्हणून सदर अज्ञात वाहन चालकाविरुध्द पो.हे.कॉ.शैलेंद्रसिंग राजपूत यांनी फिर्याद दिल्यावरून भारतीय हत्यार अधिनियम १९५६ चे कलम ४ चे उल्लंघन २५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई), १०८ प्रमाणे ुगुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि निवृत्ती पवार,ठाणे अमंलदार खंडु रतिलाल धनगर करीत आहेत.