नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील नगरपालिका सार्वजनिक ठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीकरिता शिवसेना उबाठा पक्षातर्फे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या कार्यालयास बाहेर उपोषण करण्यात आले. मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पत्र दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.
येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले यापूर्वी नगरपालिकेला ३ एप्रिल व २८ मे रोजी अर्ज दिले होते त्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे आज मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर पंडित माळी यांच्यासह सात जणांनी उपोषण केले मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनाच्या आशय असा शहरातील सार्वजनिक जागी व सार्वजनिक शौचालय असलेल्या जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहेत . अतिक्रमण काढण्यात यावे यासंदर्भात नगरपालिकेत दोनदा निवेदन देण्यात आले मात्र त्यांनी निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज सोमवार रोजी उपोषण करण्यात आले. यात जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी, उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी, विक्की वाधवाणी, विक्रम हसानी, कांतीलाल जाधव, पंकज वळवी, मनोज पटेल, वैशाली चौधरी हे उपोषणासाठी बसले होते.
मुख्याधिकारी यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले आहे त्यात म्हटले आहे की दिनांक १२ जून पासून प्रमुख रस्त्यांवरील व सार्वजनिक ठिकाणावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले.