नंदुरबार l प्रतिनिधी
नाशिक विभागातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यात नंदुरबार जिल्हयाचा ९५.३९ टक्के निकाल लागला. नाशिक विभागात नंदुरबार जिल्हयाचा निकाल दुसरा क्रमांकाचा लागला आहे.
मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात नंदुरबार जिल्हयाचा निकाल ९५.३९ टक्के लागला. जिल्हयात इयत्ता दहावीसाठी २० हजार ७९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २० हजार २४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील ८ हजार ७९३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ७ हजार ८४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ हजार ४२१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २५१ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत.
खासगी विद्यार्थ्यांचा ९८.४३ टक्के निकाल
नंदुरबार जिल्हयात ६५ खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील ६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ३८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ३ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत.
पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांचा ६५.८६ टक्के निकाल
नंदुरबार जिल्हयात १६८ पुनर्परिक्षार्थींनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी १६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील ५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर १०३ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले.
नवापूर तालुक्याचा सर्वाधिक निकाल
नंदुरबार जिल्हयात सर्वाधिक निकाल नवापूर तालुक्याचा लागला आहे.
अक्कलकुवा तालुक्यात २ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ७२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार ५६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १ हजार २८७ विद्यार्थी व १ हजार २७८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. अक्क्लकुवा तालुक्याचा निकाल ९४.१६ टक्के लागला.
धडगाव तालुक्यात १ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ३४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ६४२ विद्यार्थी व ६९९ विद्यार्थिनींचा समावेश आहे. धडगाव तालुक्याचा निकाल ९३.५७ टक्के लागला.
नंदुरबार तालुक्यात ५ हजार ६७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ५८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५ हजार ३५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २ हजार ८१२ विद्यार्थी व २ हजार ५४३ विद्यार्थिनींचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्याचा निकाल ९५.९६ टक्के लागला.
नवापूर तालुक्यात ३ हजार ८१० विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ६८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३ हजार ५९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १ हजार ८७७ विद्यार्थी व १ हजार ७१८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. नवापूर तालुक्याचा निकाल ९७.६३ टक्के लागला.
शहादा तालुक्यात ५ हजार ९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार ८९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४ हजार ६९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २ हजार ४७० विद्यार्थी व २ हजार २२० विद्यार्थिनींचा समावेश आहे. शहादा तालुक्याचा निकाल ९५.७३ टक्के लागला.
तळोदा तालुक्यात १ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ८९६ विद्यार्थी व ८६७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. तळोदा तालुक्याचा निकाल ९१.३९ टक्के लागला.
मुलींचीच टक्केवारी अधिक
नंदुरबार जिल्हयात एकुण २० हजार ७९२ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी २० हजार २४२ विद्यार्थ्यानी परीक्षेची परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९ हजार ९८४ विद्यार्थी व ९ हजार ९२५ विद्यार्थिनींचा समावेश आहे. जिल्हयात ९४.३० टक्के विद्यार्थी व ९६.५८ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.