नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात कापुस बियाण्याच्या विशीष्ट वाणांची जादा दराने विक्री केल्यास होईल कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ यांनी केले.
नंदुरबार जिल्हयात खरीप २०२४ हंगामास सुरुवात होत असल्याने जिल्हयाती सर्व कृषि सेवा केंद्र स्तरावरुन कापुस बियाणेच्या विशिष्ट वाणांची शासनाच्या कमाल किमती पेक्षा वाढीव दराने विक्री करु नये असे जिल्हयातील तमाम निविष्टा विक्रेत्यांना सुचित करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांकडुन मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या कापुस बियाणेच्या विविध कंपन्यांच्या विशिष्ट वाणांची जसे – मे अजित सिडसचे अजित 155BG-II, मे रासी सिडस प्रा.लि. कंपनीचे रासी RCH-659 BG ॥, मे तुलसी सिडस चा Kabaddi -144 BG II, मे नाथ बायोजीन्स चा संकेत NBC-1111 BG॥, मे न्युझीविडु सीडस प्रा.लि. चा ASHA (NCH9011) BG-II, व राजा (NCH 954) BG-II, मे एसीयन सीडस प्रा.लि. चा गोल्ड कॉटBG-II, में क्रिस्टल सीडस प्रा.लि. चा Surpass SP-7670 BG-II, मे सीडववर्क्स इंटरनॅशनल प्रा.लि. कंपनीचा US 7067 BG-II (SWCH4749) मे महिको प्रा.लि. चा Bahubali MRC-7918 BG-II, धनदेव गोल्ड VICH-314 BG-I॥ मे. अंकुर सीडस प्रा.लि. कंपनीचा अंकुर 3028, हरीष अंकुर-216 BG-II व किर्ती अंकुर 3066 BG-॥ मे. कावेरी सीडस लि. कंपनीच्या KCH-311 BG-II, (ATM), KCh14 K 59 BG-11 (जादू) इ यांचा समावेश आहे.
अशा कापुस बियाणे वाणंच्या जादा दराने विक्री होऊ नये व त्यास प्रतिबंध करणे हेतु जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार यांचे अधिनस्थ क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांची कृषि सेवा केंद्र स्तरावर संपर्क अधिकारी म्हणुन नेमणुक करण्यात येत आहे. तसे जिल्हयातील काही अधिकारी/कर्मचारी तथा बियाणे निरीक्षक हे छुप्या पध्दतीने गस्त घालीत आहेत. व भरारी पथक देखील कार्यान्वीत झालेले आहे. ज्या ठिकाणी अशा पध्दतीने जादा दराने विक्री होण्याच्या संशय आहे. अशा दुकानातुन कापुस बियाणे विक्री केलेल्या शेतकऱ्यांची यादी घेवुन ग्राम स्तरावर पडताळणी करण्यात येईल. व जादा दराने विक्री आढळुन आल्यास संबंधित कृषि सेवा केंद्रावर महाराष्ट्र कापुस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री, व विक्रीच्या किमतीचे निश्चीत करण्याच्या विनियम) अधिनियम २००९ मधील तरतुदी नुसार तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याबाबतीत कंपन्यांच्या सहभाग आढळुन आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनी विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ यांनी केले आहे.
याव्दारे शेतकरी बांधवांच्या तक्रारी असल्यास जिल्हा स्तरावर कार्यान्वीत असलेले जिल्हा नियंत्रण कक्षास संपर्क करावा.
तक्रार असल्यास खालील अधिकाऱ्याची संपर्क साधावा.
(१) एस ए शेळके 9404110878. जिल्हा गुणवंता नियंत्रण निरीक्षक ,जि. अ. कृ. कार्यालय नंदुरबार
(२) एस. एन. देवरे मोहीम अधिकारी जि. प. नंदुरबार 7588763089