नंदुरबार l प्रतिनिधी
कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथे “शास्त्रोक्त मधमाशीपालन” हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे सौ. आशादेवी राजपुतयांनी मधाचे गुणधर्म व काढणी पश्चात प्रक्रिया उद्योग तसेच शेतीपूरक व्यवसाय याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु. बी. होले होते.
डॉ. होले यांनी मधमाशी पालनाचे फायदे आणि मधुमक्षिका सर्वंधन हि काळाची गरज आहे तसेच मधमाशीच्या विविध प्रजाती व त्यांचे संगोपन याबद्दल मार्गदर्शन केले. सहयोगी प्राध्यापक डॉ. एस यु बोराळे यांनी मधमाशीचे परागीभवनातील महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. सहाय्यक प्राध्यापक डॉ. के. व्ही. देशमुख व डॉ. एम एस भारती यांनी मधमाशी पालनासाठी वापरले जाणारे साहित्य व मधमाशांची हाताळणी याचे प्रात्यक्षिक तसेच मधमाशांवर येणाऱ्या कीड व रोगांचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी कोमलसिंग राजपूत, सहयोगी प्राध्यापक डॉ. पी. पी गिरासे, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष, कृषि महाविद्यालयातील ए. पी. खोंडे ,डॉ. एस. डी. जगताप आणि डॉ एस.जे. गावित आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मधमाशीचे संवर्धन व पालन कसे करावे तसेच पिक काढणी पश्चात प्रक्रिया करून चांगले उत्पन्न कसे कमवावे अशा विविध लघु उद्योगांबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम एस भारती व आभार प्रदर्शन डॉ. के व्ही देशमुख यांनी केले.