Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लेगापाणी येथे पैसे मागितल्याचा वादातून एकाला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

team by team
May 20, 2024
in क्राईम
0
लेगापाणी येथे पैसे मागितल्याचा वादातून एकाला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

नंदुरबार l प्रतिनिधी

मावसा-मावशीचे भांडण सुरू असताना ते सोडविण्यासाठी गेलेल्या एकाने मावशाला लाकडी बॅटने बेदम मारहाण केल्याने त्याचा उपचार घेताना मृत्यू झाल्याची घटना लेघापाणी (ता. शहादा) येथे घडली. दरम्यान, या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत म्हसावद पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक करण्यात आली आहे. कंज्या ऊर्फ कांजऱ्या कन्या भिल (28, रा. कोटबांधणी, ता. शहादा) असे मृताचे नाव आहे, तर मंगलाल चंद्रसिंग भिल (20, रा. लेघापाणी) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनुसार, कोटबांधणी येथील कांजऱ्या भिल हा 11 मे रोजी त्याच्या सासरी लेघापाणी येथे गेला होता. तेथे त्याने त्याच्या पत्नीकडे असलेले 15 हजार रुपये खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांसाठी मागितले. त्यावरून कांजऱ्या व त्याच्या पत्नीमध्ये वाद होऊन भांडण झाले. मावसा व मावशीचे सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी मंगलाल चंद्रसिंग भिल हा युवक तेथे गेला. भांडण सोडवीत असताना त्याचा राग अनावर झाल्याने त्याने लाकडी बॅटने मावसा कांजऱ्या भिल याला बेदम मारहाण केली.

पोटात आणि कमरेवर मारहाण केल्याने तो जबर जखमी झाला. त्याला तातडीने म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला.

याबाबत भिलसिंग भिल यांनी फिर्याद दिल्याने मंगलाल भिल याच्याविरुद्ध म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारजवळ सलमानसह शाहरुख खानवर चाकु हल्ला

Next Post

गौऱ्या येथिल डाकीण ठरविणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next Post
गौऱ्या येथिल डाकीण ठरविणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गौऱ्या येथिल डाकीण ठरविणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add