Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गौऱ्या येथिल डाकीण ठरविणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

team by team
May 20, 2024
in क्राईम
0
गौऱ्या येथिल डाकीण ठरविणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नंदुरबार l प्रतिनिधी
देश 21 व्या शतकात वाटचाल करीत आहे.एकीकडे लोकसभेची धुमाळी सुरू आहे.त्यात विविध विकासाचे स्वप्न दाखवण्यात येत आहेत तर दुसरीकडे लोकसभेतील देशातील पहिल्या मतदारसंघातील सातपुड्यात जादूटोणा करून मुलाचा मृत्यू दोषी समजून एका 55 वर्षे महिलेला तब्बल दीड महिने गावाबाहेर काढण्यात आले होते अखेर महिलांना डाकीण ठरविणाऱ्या गौऱ्या ता.धडगाव मांत्रिक रुल्या हुण्या पराडके याला पोलीसांनी अटक केली असून त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पानबारी (ता.धडगाव) येथील महिलेने डाकीण ठरवून मारहाण केल्याबाबत पीडित महिलेने धडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.या फिर्यादीत गौऱ्या ता.धडगाव येथील मांत्रिक रुल्या हुण्या पराडके याने ती महिला खरोखर डाकीण आहे, तीनेच जादुटोणा करून मुलाला खाल्ले आहे, हे सिद्ध झाले असल्याचे मारहाण करणाऱ्या आरोपींना सांगितले होतें. त्याच्या सांगवण्यावरून आरोपींनी पीडितेला डाकीण ठखून मारहाण केली होती.त्यांनतर पीडिता दीड महिन्यापासून घर सोडून राहत होती.या प्रकरणी या मांत्रिकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात करण्यात आलेला नव्हता.

या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यानी डाकीण प्रथा विरोधी प्रबोधन संवाद यात्रेअंतर्गत पीडित महिलेची भेट घेवून तिची आपबिती जाणून घेतली. त्यानंतर पानबारी येथे जावून पीडितेच्या कुटुंबीयांची व आरोपी कुटुंबाची भेट घेवून त्यांचे समुपदेशन केले.

दरम्यान, गौऱ्या येथे जावून अनिस कार्यकर्त्यानी मांत्रिकाचे स्टिंग ऑपरेशन केले. त्यानंतर धडगाव पोलीस ठाणे गाठले.पीडित महिलेने फिर्यादीत मांत्रिकाचे नाव दिले असताना त्याच्यावर गुन्हा का दाखल केला नाही याबाबत विचारणा केली व गुन्हा दाखल करावा या आशयाची लेखी तक्रार देखील दिली व सर्व प्रकारची व्हिडीओ रेकॉर्डीग व फोटो पोलीस निरीक्षकांपुढे सादर केले.

यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव ठकसेन गोराणे, सरचिटणीस विनायक सावळे,जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील,प्रधान सचिव वसंत वळवी,किर्तीवर्धन तायडे,हंसराज महाले,प्रदीप केदारे आदी उपस्थित होते. तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक यांनी संध्याकाळी सहा वाजेनंतर गौऱ्या येथे जाऊन मांत्रिक रुल्या हुण्या पराडके याला अटक केली.

बातमी शेअर करा
Previous Post

लेगापाणी येथे पैसे मागितल्याचा वादातून एकाला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना सरासरी वीज बिल प्राप्त होत असल्याने निर्माण होतोय असंतोष

Next Post
वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना सरासरी वीज बिल प्राप्त होत असल्याने निर्माण होतोय असंतोष

वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना सरासरी वीज बिल प्राप्त होत असल्याने निर्माण होतोय असंतोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add