नंदुरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, साईनाथ वंगारी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2025 हा ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक (गायन आणि वाद्य) कार्य, खेळ, नाविण्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य, पर्यावरण व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांना हा दिला जाणार आहे. यासाठी 31 जुलै, 2024 रोजी मुलाचे वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंत असावे.
या पुरस्कारासाठी केंद्र शासनाने अर्ज मागविलेले असून हे अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फतच ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातील. संकेतस्थळाव्यतिरीक्त प्राप्त होणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. या पुरस्कारांची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध असून या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2024 पर्यंत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्री. वंगारी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.