शहादा l प्रतिनिधी
‘एक रेसु तो थेट रेसु’ या समाजात रूढ असलेल्या संकल्पनेच्या आधारावर जर्मनीतील उल्म शहरात अक्षयतृतीयेचा योग साधत जर्मनीतील लेवा पाटीदार गुजर समाजाचे पहिले स्नेह संमेलन दिनांक १० आणि ११ मे २०२४ रोजी उत्सहात पार पडले.
या संमेलनासाठी जर्मनीत नोकरी आणि शिक्षणासाठी आलेले आणि जर्मनीत विविध राज्यात स्थाइक असलेले सर्व गुर्जर मंडळींना ३ महिनांच्या अथक परिश्रमानंतर एकत्र आणण्यात समाज बंधूना यश आले.
आज जर्मनी हा देश आपल्या शिस्तबद्धता, तंत्रज्ञान आणि भाषेचा जोरावर आपले जगातील स्थान टिकवून आहे. अशा ठिकाणी आपल्या गुजर बंधूनी स्थलांतर करत आपले स्वतःचे छोटे विश्व निर्माण केले आहे. आज या स्थलांतरित लोकांना एकत्र आणण्यासाठी फक्त दोन दिवसाचा अथक परिश्रमाने जर्मनी सारख्या देशात सर्वानी जे काही प्रयत्न केले ते कल्पने पलीकडचे होते. जर्मनीतील बंधूनी इतिहास घडवला. गुजर बंधू-भगिनी जर्मन भूमीवर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आले. सात महिन्यांच्या वयोगटापासून ते तरुण आणि कुटुंबांपर्यंत सर्वच मोठया उत्साहाने एकत्र आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जर्मनी स्थित प्रत्येकाने आपापल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले. पहिला दिवस (१० मे २०२४) हा दिवस जर्मनी भूमितील गुजर समाज बंधूसाठी ऐतिहासिक ठरला. सर्वांनी कार्यक्रमस्थळी पोहोचताच चहा पोह्या चा आस्वाद घेत अनेक नवीन लोक किंवा काही लोक ज्यांच्याशी फक्त फोनवर बोलून चर्चा झाली होती, पुसटशी ओळख होती. परंतु त्या वैयक्तिकरित्या कधीही भेटले नव्हते अशा सर्व गुजर बंधू भगिनींनी एकत्र येत नवीन जिव्हाळा प्रस्थापित केला.
आम रस, पापडी, आलू भाजी, वरण-भात, पापड आणि कुरडईचे दुपारचे जेवण म्हणजे भारत सोडल्यानंतर घरच्या जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. त्यानंतर दुपारचा सत्रात खेळ खेळण्याचा प्लॅन विचारपूर्वक आखला गेला.सर्वांच्या भावना सामायिक केल्या गेल्या. जर्मनीला पोहोचण्यासाठी जीवनाचा संघर्ष, आणि जर्मनीतील गुजर सहकारी बंधू/भगिनींनी एकमेकांना येथील जीवन चांगले बनवण्यासाठी कशी मदत व सहकार्य केले. अशा सर्व प्रकारच्या भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या.
संजयभाईं पटेल (शहादा ) यांनी आपल्या मौलिक शब्द सुमनांनी सगळ्यांचे मार्गदर्शन केले. निस्वार्थपणे मदत व सहकार्य करणाऱ्या लोकांना एवढ्या मोठ्या व्यासपीठावर त्यांच्या पाठिंब्याचा स्वीकार होतो हे पाहून खूप समाजाला एकत्र करणाऱ्या बंधूना खूप आनंद झाला. यामुळे भविष्यात त्यांना अधिक सामाजिक काम करण्याची ऊर्जा मिळेल.
दुपारचा चहा अत्यंत ताजेतवाना होता. त्यामुळे सर्वजण प्रत्येकजण एका घोट बरोबर एकमेकांचा आपुलकीने चिंब झाले. जन्मभूमीचा मातीतून कार्यक्रम यशस्वतेची अनमोल अशी पावती मिळाली, जेव्हा व्हीएसजीजीएम अध्यक्ष मोहनभाई पटेल (भरूच ) आणि अखिल भारतीय गुजर समाजाचे पदाधिकारी जगदीशभाईं पटेल (निझर ) यांनी पहिल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.
त्यांनी या पहिल्या स्नेहमिलनाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व जर्मनीकर बंधू भगिनींनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले, यावेळी सर्वांनी ग्रुप फोटो, व्यतिगत ग्रुप फोटो आणि फॅमिली ग्रुप फोटो काढले आणि दिवस अखेर स्वादिष्ट पावभाजीचा आस्वाद घेतला आणि आपला सर्व जण एकत्र येऊन गरब्यावर ठेका धरतं कार्यक्रमाला चार चांद लावले यावेळी गुजर समाजातील पारंपारिक विवाहसोहळ्या सारखा सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून दाद दिली.
दुसरा दिवस (११ मे २०२४) यावेळी रिव्हर साइड पार्कमध्ये दुसरा दिवस नियोजित होता. चहा आणि अल्पोपहार नंतर, लोक पुन्हा उल्ममध्ये थांबले. आणि शहराच्या प्रसिद्ध चर्च आणि डाउनटाउनच्या सहलीला सुरुवात झाली. शहराच्या फेरफटका मारल्यानंतर गरमागरम जेवण (पनीर मसाला, पराठा, दाल, भात आणि रसगुल्ला) याचा निसर्गाच्या सानिध्यात बसून आस्वाद घेण्यात आला. यानंतर बहुतेक बंधू, भगिनी आणि बाल मंडळीने व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, फ्लाइंग डिस्क्स आणि क्रिकेट या वेगवेगळ्या खेळांवर हात आजमावला. हे दृश्य पाहण्यासारखे आणि टिपण्यासारखे होते.
सर्व जण देह हरपून मुक्त पक्ष्यांसारखे खेळले, संध्याकाळी बार्बेक्यू ग्रिल उजळू लागले आणि सर्वांचे पोट अमर्यादित व्हेज ग्रिल प्लेटर्स आणि व्हेज पुलाव खाऊन तृप्त झाले. यावेळी एकत्रित जमलेल्या सर्व बंधू- भगिनींचे आभाराचे शेवटचे शब्द आणि कृतज्ञता, प्रेम, सर्व सहभागींबद्दल आदर व्यक्त करण्यात आला.
यावेळी सर्व जर्मनीकर गुजर बंधू भगिनींनी सर्वांनी एकत्रितपणे ठरवले. द्वितीय वर्षाच्या कार्यक्रमाची योजना जर्मनीतील नवीन ठिकाणी करणार यावेळी अनेक सहभागी बंधू भगिनींनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यास उत्सुकता दर्शविली आणि प्रत्येकाने पुष्टी केली की ते पुढच्या वर्षी सुद्धा सहभागी होतील. पुढच्या वर्षी ही संख्या ५० पेक्षा मोठी असेल हे नक्की. उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांचा “Only Ladies” group तयार केला. ते ग्रुपमध्ये त्यांच्या कल्पना/विचारांची देवाणघेवाण करण्यात येणार आहे, नवीन मैत्रीणी बनवणार आहेत आणि जर्मन गुजर समुदायाच्या यशात अधिक चांगले योगदान कसे देऊ शकतात ते सुनिश्चित करतील.
भविष्यात फेसबुक पेजचे नियोजन केले जात आहे. लोकांना येथे भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर वन स्टॉप सोल्यूशन देणे ही आयडिया आहे- उदा. एजंटशिवाय जर्मन विद्यापीठ मध्ये ऍडमिशन कसे
मिळवणे? आदी गोष्टीवर भर देण्यात येईल. समाजाची एक वेबसाइट देखील नियोजित आहे आणि येत्या काही दिवसात चर्चा केली जाईल आणि लवकरच ती थेट Online पाहण्याची आशा आहे. 5. सर्वांनी सहमती दर्शवली की समूह समुदाय सदस्यांमध्ये अनौपचारिक चर्चा करण्यासाठी अधिक वारंवार (मासिक किंवा गरजेच्या आधारावर) झूम कॉलची व्यवस्था करण्यात येईल. समस्यांवर चर्चा करून आणि एक समुदाय म्हणून सर्वजण एकमेकांना कशी मदत करू शकतील ते सुनिश्चित केले जाईल. स्नेहमिलन सोहळा यशस्वीतेसाठी अमोलभाई तुकाराम चौधरी (न्यू बामखेडा), नंदलालभाई पटेल (निझर) आणि अंकितभाई पटेल (सरावाळा) या तीन समाज बंधुंचा निस्वार्थ प्रयत्नांशिवाय हा स्नेह मिलनाचा कार्यक्रम साकारणे शक्य नव्हते.
अश्या त्रिदेवांना समाजाचा वतीने मानाचा मुजरा ज्यांनी या बंधुचा संकल्पनेला अविरत पाठिंबा दिला आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिले अश्या जर्मनी स्थित सर्व गुजर बंधू- भगिनींना VSGGM परिवाराचा वतीने खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.