नंदुरबार l प्रतिनिधी
जागतिक परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल दिन महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटना नंदुरबार 3130 यांच्यावतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संजिव वळवी, माता बाल संगोपन आरोग्य अधिकारी.डॉ, दिनेश वळवी, साथ रोग आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोंकणी, जिल्हा नोडोल आरोग्य अधिकारी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलित करून पूजन केले.
फलॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिवस केक कापून साजरा करण्यात तसेच कार्यक्रमाला लॉरेन्स नाइटिंगेल डे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नर्सेस यांना आलेल्या प्रमुख पाहुण्या कडून गुलाबाचे फुल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यात गायन स्पर्धा ,नृत्य स्पर्धा ,फॅशन शो , ग्रुप डान्स या स्पर्धेमध्ये परिचारिका व परिचारिकांची मुला-मुलींनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या कलेचे सादरीकरण केले यात एक,, दोन ,तीन याप्रमाणे स्पर्धक निवडून स्पर्धकांना पारितोषिक ट्रॉफी देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्रीमती ज्योती संदानशिव अध्यक्ष , कोषाध्यक्ष श्रीमती सिंधू गवळी, तालुका अध्यक्ष श्रीमती सरला तिरमले तालुका कार्याध्यक्ष श्रीमती रेखा मेसरे, श्रीमती सत्यकला नेवारे ,श्रीमती अनिता वळवी संघटना उपाध्यक्ष ,श्रीमती अरुणा वळवी तालुका अध्यक्ष ,श्रीमती पूजा पवार व सर्व तालुक्यामधील तालुका संघटना पदाधिकारी व सर्व जिल्ह्यातील सर्व नर्सेस भगिनींनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.