नंदुरबार l प्रतिनिधी
सुमारे 900 वर्षांपूर्वी लोकसंसदेची यशस्वी स्थापना करणारे, महिला सक्षमीकरणाचे जनक क्रांतीसुर्य, समतानायक, थोर समाज सुधारक,लिंगायत धर्म संस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे कार्य सर्व समाज घटकांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार येथील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर भागात थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 892 व्या जयंती निमित्त रघुवंशी बोलत होते. रघुवंशी पुढे म्हणाले की, कर्नाटक राज्यात जन्मास आलेले महात्मा बसवेश्वर महाराज यांनी सुरू केलेले कार्य शतकानुशतके इतिहासात अजरामर आहे. सदैव सामाजिक बांधिलकी जोपासणारे महादू हिरणवाळे यांनी महात्मा बसवेश्वरांचे कार्य नंदुरबार जिल्ह्यात रुजवले. तसेच शासकीय स्तरावर बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्याच्या मागणीला देखील यश आले. आजच्या युवा पिढीने देखील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
अक्षय तृतीयेला तिथीनुसार महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र बसव परिषद नंदुरबार जिल्हा, वीरशैव लिंगायत गवळी समाज आणि शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिवादन प्रसंगी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कर्नाटक येथून आणलेले भस्म (इबित) मान्यवरांच्या कपाळाला लावण्यात आले. तदनंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, अर्धाकृती पुतळा तसेच ध्वज लक्षवेधी ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले. सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक जी.एस. गवळी यांनी तर आभार संभाजी हिरणवाळे यांनी मानले. अभिवादन कार्यक्रमास नंदुरबार नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, क्षत्रिय राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत, राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, नंदुरबार जिल्हा महिला सक्षमीकरण सदस्या श्रीमती सुलभा महिरे, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बी.डी. गोसावी, पत्रकार हिरालाल चौधरी, भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे सचिव रामकृष्ण मोरे, शेतकरी सेवा संघाचे कर्मचारी जगन खेडकर, डॉ. भूषण पालकडे, सुभाष चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, भास्कर रामोळे,वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे लक्ष्मण यादबोले, मनोहर बारसे, अण्णा घुगरे, लक्ष्मण गठरी, नटावद एनटीव्हीएस शाळेचे उपशिक्षक भरत गवळी, इंदिरा महिला बँकेचे निवृत्त कर्मचारी आवडाजी गवळी, अशोक यादबोले, दीपक गोडळकर( शिरपूर ),सच्चिदानंद व्यायाम शाळेचा मल्ल पवन गवळी,आदी उपस्थित होते. महादू हिरणवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन प्रा. एकनाथ हिरणवाळे, सदाशिव गवळी, काशिनाथ गवळी, सुदाम हिरणवाळे,राहुल पाटील, विशाल हिरणवाळे,गोपाळ हिरणवाळे आदींनी संयोजन केले.