म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथे म्हसावद पोलीसाच्या तावडीतून फरार झालेल्या आरोपीस पकडण्यात म्हसावद पोलीसांना यश आले आहे.
जालमसिंग प्रेमदास मोरे(३८) हा आरोपी भादंवी कलम ३७०,४२०,५०४,५०६,३४ प्रमाणे या गुन्ह्यातील आरोपी होता.त्याच्यासह इतर आरोपीना नेत असताना शहादा येथे म्हसावद पोलीसांना गुंगारा देवून फरार झाला होता.
दरम्यान आरोपी हा नांदिया,विरपूर भागात फिरत असल्याची माहीती मिळाल्यानुसार म्हसावदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील,जामदार सुनिल पाडवी,शैलेंद्रसिंग राजपूत,उमेश पावरा, राकेश पावरा,अजित गावीत यानी गावाजवळ सापळा रचून आरोपीस शिताफीने पकडण्यात यश मिळवले.
त्यानुसार सदर आरोपीविरूद्ध भादंवी कलम २२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास वैद्यकीय तपासणीसाठी म्हसावद ग्रामीण रूणालयात घेवून जाण्यात आले आहे.








