धडगांव l प्रतिनिधी-
कोरोना विरुद्ध लढाई आपल्याला जिंकायची आहे . आणि या लढाईत जिंकण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे” असे प्रतिपादन मुख्याध्यापिका अलका पाडवी यांनी कोविड -१९ लसीकरण जनजागृती कार्यक्रमाच्या प्रसंगी केले. धडगांव तालुक्यातील विविध ठिकाणी विविध गावांत स्थानिक बोलीभाषेतून लघुचित्रपट व शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या आदिवासी जनजागृती टीमचे अभिनंदन केले
सदर कार्यक्रमात कोविड -१९ लसीकरण जनजागृतीपर आदिवासी जनजागृतीने तयार केलेल्या लघुचित्रपट व तालुक्यातील प्रशाकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींचे लस घेण्याचे आवाहन करणारे व्हिडीओ प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले केंद्र शासनाने कोविड -१९ लसीकरण व आत्मनिर्भरभारत वर लोककलेच्या माध्यमातून जनजागृती हा एक अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे. सांस्कृतिक कलापथकं गीत व पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी प्रबोधन करत आहे.त्याच धरतीवर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव सारख्या अतिदुर्गम भागातील विविध गावात जाऊन नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घ्यावी असे आव्हान करत आहे. सदर उपक्रम आदिवासी जनजागृती टिमच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.