नंदुरबार l प्रतिनिधी
कृषी कल्याण व ग्रामीण भागाचा विकासहे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वनश्री शेतकरी उत्पादक कंपनी संचलित वनश्री जिनिंगचे उदघाटन व वनश्री सूतगिरणीचा भूमिपूजन सोहळा नांदरखेडा (ता. शहादा) येथे रविवारी दि.१० ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनऊला होणार असून तत्पूर्वी सकाळी आठ वाजता कलश पूजन होईल. उपस्थितीचे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष वनश्री मोतीलाल पाटील, वनश्री शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन अभिजीत पाटील, संचालक रमेश चौधरी, शिवाजी पाटील, दगडू पाटील, संगीता पाटील, यशवंत पटेल, अनिल पाटील ,योगेश पटेल ,दिनेश पाटील व शेतकरी उपस्थित राहणार आहे.
माजी जिल्हा परिषद सभापती अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी वनश्री शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. उत्पादित मालाला भाव मिळावा यासाठी वनश्री जिनिंग उभारली त्यासोबतच स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा,शेतकऱ्यांचे हित साधले जावे ही दूरदृष्टी ठेवून वनश्री सूतगिरणी भूमिपूजनाच्या कार्यक्रम ही रविवारी होत असून उपस्थितीचे आवाहन वनश्रीचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.