नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा नूतन कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
येथील बायपास रस्त्यावरील अंबिका कॉलनी परिसरात बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले यापूर्वी गावात वर्दळाच्या ठिकाणी असलेली ही बँक आता नवीन जागेत स्थलांतर करण्यात आली या शाखा कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बँकेचे झोनल मॅनेजर प्रवीण कुमार सिंह, लीड बँकेचे मॅनेजर सचिन गांगुर्डे, शाखा व्यवस्थापक इलीयास अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यालयाच्या उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की बँकेचे काम चांगल्या प्रतीचे असून आपल्या बँकेमार्फत सामाजिक व शेतकऱ्यांच्या साठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे व्यवहार करण्यात येतात ते चांगल्या प्रकारे करत असून यापुढेही आणखीन केंद्र व राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवाव्या असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्राहकांना मार्गदर्शन केले व ग्राहकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी बँकेचे ग्राहक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रमिक अधिकारी पल्लवी बोटे यांनी तर आभार प्रदर्शन परियोजना अधिकारी अभिनव आर्य यांनी केले.