Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे खुर्द येथे अक्षय तृतीयेला भरणार श्री.खंडेराव महाराजांची यात्रा, बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन

team by team
May 8, 2024
in राज्य
0
उमर्दे खुर्द येथे अक्षय तृतीयेला भरणार श्री.खंडेराव महाराजांची यात्रा, बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन

नंदूरबार l प्रतिनिधी
उमर्दे खुर्द ता. नंदुरबार येथील श्री.खंडेराव महाराज यांची यात्रा 10 मे रोजी अक्षय तृतीयेला भरणार असून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम ही होणार आहे.

 

 

 

नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे यंदा श्री.खंडेराव महाराज यात्रा भरण्याचा ग्रामस्थांतर्फे निर्णय घेण्यात आला. 9 व 10 मे रोजी खंडेराव महाराजांची यात्रा भरण्याचे आयोजन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. 9 मे रोजी सायंकाळी पाच वाजता ज्या जागेवर बारा गाडी ओढण्यास सुरुवात होते, त्या जागेवर वाजत-गाजत सुहासिनीद्वारे पाण्याचा सडा टाकला जातो.

 

 

 

10 मे रोजी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाचवी पिढीतील श्रीखंडेराव महाराजांचे सेवेकरी महेंद्र मराठे बारा गाडी ओढणार आहेत. पाच वर्षापासून जितेंद्र मराठे हे यात्रेत बारा गाड्या ओढत आहेत.मागील वर्षापासून महेंद्र मराठे हे बारा गाड्या ओढणार आहेत.

 

 

 

महेंद्र मराठे यांचे खापर पंजोबा श्री खंडेरावाचे सेवकरी लकडू मराठे हे आईचा आहे आईचाळे ता. साक्री इथून उमर्दे खुर्द येथे वास्तव्यास आले त्यांनी बारा गाडी ओढण्याच्या कार्यक्रमास सुरुवात केली. उमर्दे येथे खंडेरावाची स्थापना केली तेव्हापासून अखंडपणे अक्षय तृतीया खंडेरावाची यात्रा भरते.१९९५ श्री. खंडेराव महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.श्री.खंडेराव महाराज माळसाबाई व बानुबाई यांची मूर्ती स्थापना करण्यात आली. बारा गाड्या ओढण्याचा जातात.लकडू मराठे नंतर त्यांचा मुलगा दगा लकडू मराठे , गोकुळ दगा मराठे, सुदाम गोकुळ मराठे आता पाचव्या पिढीतील श्री. खंडेराव महाराजांचे सेवेकरी जितेंद्र सुदाम मराठे यात्रेत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम करतात.मागील वर्षापासून त्यांचे लहान भाऊ महेंद्र मराठे हे बारा गाड्या ओढत आहेत.

 

 

10 मे अक्षय तृतीयेला सायंकाळी पाच वाजेपासून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रमास सुरुवात होते.वाघ्या मुरळी या भोप्प्या यांच्यासोबत वाजत गाजत श्री. खंडेरावाचे सेवेकरी पानझोक व मोर पिच्छा घेऊन बारा गाड्यांना पाच प्रदक्षिणा घालतात. बारागाडी होण्यापूर्वी साकळ(नांगरटीची) तोडली जाते. त्या नंतर बारा गाड्या ओढल्या जातात. बारा गाड्या गावातून गोळा केल्या जातात सुरुवातीला तगतराव नंतर बारागाड्या ची रचना केली जाते.हा कार्यक्रम पाहण्यासाठी नंदुरबार सह परिसरातील धामडोद, दहिंदुले भालेर, नगाव, तिशी ,अक्राळे, वावद ,खोंडामळी विखरण शिंदगव्हान, काकर्दे आधी गावातील भाविक खंडेरावाच्या दर्शनासाठी व कार्य बारा गाडी ओढण्याच्या कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते.

 

 

 

 

यात्रेत लहान मुलाच्या मनोरंजनासाठी पाळणे व पालख्या दाखल झाल्या असून यात्रेत हलवाई व थंड पेयाची दुकाने थाटली जातात. यंदा श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरत असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.हिना गावित यांना मत म्हणजेच मोदींना मत; शिरपूरच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

Next Post

राणीपूर येथे अवैध मद्यासह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
राणीपूर येथे अवैध मद्यासह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

राणीपूर येथे अवैध मद्यासह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add