नंदुरबार l प्रतिनिधी:
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे खेलो महाराष्ट्र खेलो राज्यस्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत मुलींनी दमदार कामगिरी करून नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून संपूर्ण महाराष्ट्रातून काथे व कुमिते या दोन प्रकारात सहा सुवर्णपदक व रौप्य पदक, कांस्यपदक प्राप्त केले.
या स्पर्धेत नागपूर ,मुंबई ,पालघर, ठाणे, औरंगाबाद, जालना, अहमदनगर पुणे ,नंदुरबार, धुळे ,जळगाव या जिल्ह्यांचा खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
यावेळी स्पोर्ट्स कराटे असोसिएशन नंदुरबार चे विजयी खेळाडू ज्युनिअर गटात सिद्धी अंबालाल पटेल,(45किलो) सुवर्णपदक, अक्षदा दिनेश बैसाणे ( 30किलो) सुवर्णपदक, रुचिता प्रवीण पाटील( 40किलो) सुवर्णपदक ,तेजस्विनी गणेश बेहरे (50किलो) सुवर्णपदक ,राजनंदनी नागराज पाटील (48किलो) ,सुवर्णपदक सीनियर गटात प्रांजल दिनेश बैसाणे ( 62 किलो) सुवर्णपदक या यशस्वी विद्यार्थ्यांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शुभहस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन खेळाडूंचे सन्मान करण्यात आला .
या विद्यार्थ्यांना नंदुरबार जिल्ह्याचे कराटे सचिव व कराटे प्रशिक्षक डॉ दिनेश बैसाणे यांचे मार्गदर्शन लाभले या विजयी खेळाडूंची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.