Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्हा पोलीसांनी विविध कारवाईत 3 कोटीचा मुद्देमाल केला जप्त

team by team
May 4, 2024
in क्राईम
0
लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्हा पोलीसांनी विविध कारवाईत 3 कोटीचा मुद्देमाल केला जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्हा पोलीसांनी विविध कारवाईत 3 कोटीपेक्षा अधिकचा मुद्देमाल केला जप्त असून एकुण 4095 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत 24 हद्दपार प्रस्ताव, 32 पाहिजे/फरार आरोपी अटक करण्यात यश मिळविले आहे.

लोकसभा निवडणुकीचे काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने आजपावेतो एकुण 3 कोटी 08 लाखांहून अधिकचा मुद्देमाल विविध कारवाईत जप्त केला आहे. त्यात 94 लाख 11 हजार 855 रुपयांची अवैध दारु, 3 लाख 57 हजार 718 रुपये किमतींचा गांजा, तसेच प्रतिबंधीत असलेला एकुण 70 लाख 30 हजार 903 रुपये किमतीचा गुटखा, व त्यासाठी वापरण्यात येणारी वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे जिल्हयातील आजपावेतो एकूण 4095 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच विविध गंभीर गुन्हयातील एकूण 24 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. जिल्हयातील तसेच जिल्हयाबाहेरील विविध गुन्हयातील पाहिजे/फरार आरोपी असलेल्या एकूण 32 आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे. तसेच आजपावेतो जिल्हयातील 484 शस्त्र परवाना धारकांकडील शस्त्रे जमा करण्यात आली आहेत.

संपुर्ण जिल्हयात एकुण 26 आंतरराज्य आणि 8 आंतरजिल्हा तपासणी नाके/नाकाबंदी पॉइंट कार्यरत असुन या नाक्यांवरुन अवैध दारु, अंमली पदार्थ, बेहिशेबी रोकड, इत्यादी अशा अवैध बाबींची वाहतुक होणार नाही यासाठी सतर्कपणे तपासणी सुरू आहे.

अवैध धंद्द्यावर छापेमारी, कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवली जात असून, उशिरापर्यत हॉटेल्स, ढाबे, बार इ. आस्थापना सुरु राहणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे. बीट मार्शल, गस्ती पथके, भरारी पथके संपूर्ण जिल्हयात वेळोवेळी आपले कर्तव्य चोखपणे बजावित आहेत. तसेच निवडणूक प्रचारासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, प्रचारादरम्यान रहदारीस अडथळा निर्माण होवु नये, इ. सर्व बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे.

त्याचप्रमाणे सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणा-यांवर सायबर सेल हे वेगवेगळया प्लॅटफार्मवर वेळोवेळी सतर्क असून समाजविघातक पोस्ट व्हायरल/शेअर करणा-यांवर विशेष लक्ष

ठेवून आहेत. लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस विभाग कटिबध्द असून संपुर्ण विभाग सुसज्ज आहे.

“लोकसभा निवडणुक काळात कुठल्याही आमिष व भितीला बळी न पडता, आपले मतदान करावे व आपले लोकशाही कर्तव्य बजवावे” नागरिकांना काही अडचण असल्यास किंवा काही असामाजिक तत्वांबद्दल व अवैध गतिविधींबद्दल माहिती असल्यास कृपया पोलीस विभागास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी केले आहे.”

बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.मिशन हायस्कूल येथील दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

Next Post

मंत्री डॉ. विजयकुमार गावितही करताहेत दूर्गम गावांमधून डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ धावते दौरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add