नंदुरबार l प्रतिनिधी
एस.ए.मिशन हायस्कूल येथील दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली.
बालेवाडी, पुणे येथे 23 ते 28 एप्रिल 2024 दरम्यान 67 व्या शालेय राष्ट्रीय रग्बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ह्या स्पर्धेत देशातील अनेक राज्य सहभागी झाले होते, ह्या मध्ये 19 वर्ष वयोगटातील महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक (रौप्य पदक ) तर 17 वर्ष वयोगटातील महाराष्ट्राच्या मुलांच्या संघानें तृतीय क्रमांक (कांस्य पदक ) पटकावित घवघवीत यश मिळवले असून 19 वर्ष वयोगटात ईश्वर नगेंद्र रामोळे याची तर 17 वर्ष वयोगटात यामध्ये प्रणव विलास गावित याची निवड करण्यात आली होती.
यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले होते, ह्या स्पर्धेत मिशन हायस्कुलच्या 17 वर्षातील मुलांच्या संघाने राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत रौप्य पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली होती.
या दोन्ही खेळाडूंना शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले व भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल करून आई-वडिलांचे,शाळेचे नावलौकिक करावे अशा शुभेच्छा देऊन कौतुक करण्यात आले, यावेळी सोबत शाळेचे उपमुख्याध्यापक विजय पवार पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक ज्येष्ठ क्रीडाशिक्षक मीनल वळवी, क्रीडाशिक्षक सतिष सदाराव, शारदा पाटील, खुशाल शर्मा आदी उपस्थित होते, ह्या खेळाडूंचे सर्वस्तरातून कौतुक होत असून या खेळाडूंना शाळेतील क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.