Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमच्या विकास कामांमुळे सुरू झालेली विरोधकांची पोटदुखी, डॉ.असल्यामुळे आम्हीच थांबवू शकतो : महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचा प्रहार

team by team
May 3, 2024
in राजकीय
0
आमच्या विकास कामांमुळे सुरू झालेली विरोधकांची पोटदुखी, डॉ.असल्यामुळे आम्हीच थांबवू शकतो : महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचा प्रहार

नंदुरबार l प्रतिनिधी

चौफेर विकास कामांमुळेच आमच्या विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं असून ते प्रचारासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेऊ लागले आहेत. परंतु गावित परिवारात सगळेच डॉक्टर असून आम्हाला त्या पोट दुखीवरचे इलाज माहिती आहेत; असे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांनी जाहीर भाषणात सांगितले.

 

मूलभूत सुविधा देण्यासाठी आणि गावागावातील विकास कामे करण्यासाठी मागील दहा वर्षात आपल्यापर्यंत भाजपाच्या विरोधात आणि गावित परिवाराच्या विरोधात बोलणाऱ्यांपैकी कधी कोणी आले होते का? याचा विचार करूनच दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान करावे, असेही जाहीर आवाहन डॉ हिना गावीत यांनी केले.

लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खा. डॉ. हिना गावित यांनी साक्री तालुक्यातील काकशेवाड, कुडाशी, वार्सा, शेंदवड, मांजरी, चावडीपाडा, मोहगांव, बारीपाडा ,बोफखेल, शिव, विजयपुर, डांगशिरवाडे, दरेगांव, हारपाडा, म्हायचा पाडा, सुकापुर, बल्हाणे, शेवगे, कोकणगांव, धामुंदर, विरखेल, सितारामपुर, मंडाणे, पारगांव, धोंगडे, शेलबारी यांसह लहान मोठ्या गावात प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क केला.

 

भर उन्हात गाव अन गाव पिंजून काढले. त्या दरम्यान पार पडलेल्या कॉर्नर सभांमधून त्यांनी हे आवाहन केले. उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या समवेत अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी या प्रचार फेरीचे नेतृत्व केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य खंडू आप्पा कुवर, जिल्हा परिषद सदस्य सुनेत्रा साहेबराव गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य मनोज जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित, भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत घरटे, मंडळ अध्यक्ष विकी कोकणी, सरचिटणीस सुरेश शेवाळे, योगेश भामरे, शहराध्यक्ष राकेश साहेबराव, प्रवीण राऊत, सचिन शेवाळे, सचिन देसले, संजय अहिरराव, तुषार घरटे यांच्यासह त्या भागातील विविध गावाचे सरपंच उपसरपंच कार्यकर्ते आणि महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

उमेदवार डॉ. हिना गावित कॉर्नर सभेतून म्हणाल्या की, सर्वाधिक काळ सत्तेत राहून सुद्धा काँग्रेस पक्षाने कधीही आदिवासींना खरा न्याय मिळवून दिला नाही त्यांना साधे वनपट्टे सुद्धा वेळेवर दिले नाही. मोदी सरकारच्या काळात मात्र वनगावे वनपट्टे सगळ्यांचेच प्रश्न सुटले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील लाखो घरांना आम्ही घरे दिली, लहान गावात सुद्धा काँक्रिटीकरण केले, महिलांना रोजगार आणि पाण्याची सुविधा दिली. मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही, ते काँग्रेस नेते खोटं बोलून लोकांची दिशाभूल करीत आहे आणि आता आरक्षण संविधान आणि त्यासारखे मुद्दे घेऊन पुन्हा मतं मागायला येत आहेत.

 

खोटारडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा; अशा घनाघाती शब्दात महायुतीचे उमेदवार डॉ.हिना गावित यांनी हल्लाबोल केला.

 

प्रचार फेरी दरम्यान महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. जागोजागी महिलांनी औक्षण करून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. काही वसाहतींमध्ये थांबून डॉक्टर हिना गावित यांनी मतदारांशी विशेषतः महिलांशी संवाद केला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा मैदानाची डॉ. विजयकुमार गावित यांनी केली पाहणी

Next Post

नंदुबारला बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

Next Post
नंदुबारला बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

नंदुबारला बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add