नंदुरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असंतुष्ट आत्माबाबत विधानाचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी समर्थन करीत आम्ही भाजपात जाणार होतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार कधीच म्हणाले नाहीत.
असे सांगत नंदूरबार जिल्ह्यातील महायुतीतीचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे सांगत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी भेट देत चर्चा केली यावेळी खा. डॉ.हिना गावित,डॉ.सुप्रिया गावित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, माजीआमदार शरद गावित आदी उपस्थित होते.








