Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात

Mahesh Patil by Mahesh Patil
May 1, 2024
in शैक्षणिक
0
औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात

 

शहादा l प्रतिनिधी
शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीन जाधव, माजी विद्यार्थी डॉ सुनिल पांडे, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित डॉ नितीन जाधव यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय हे एक ऊर्जा देणारे महाविद्यालय असून या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी हे आज विविध ठिकाणी वरिष्ठ व उच्च पदावर विराजमान असून कार्य करीत आहेत.

 

विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी आपली शाळा -महाविद्यालयातील आठवणी नेहमी मनात घर करून असतात. जीवनात अनेक चढ – उतार येत असतात त्यात खचून न जाता अजून जोमाने कार्य करायला पाहिजे. औषधनिर्माणशास्त्र विभागात विद्यार्थ्यांना खूप चांगले भविष्य असून विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आपले भविष्य उज्वल बनवू शकतात. जन्माची चाहूल लागल्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्यात आवश्यक घटकांपैकी एक म्हणजे औषध हा घटक आहे. रुग्णांना जीवनदान मिळण्यात मोठा वाटा हा औषधांचा असतो. वैद्यकशास्त्र हे रोगाचे निदान करायला शिकवते तर औषधनिर्माणशास्त्र त्या रोगावर कोणते औषध वापराव, ते कसे तयार करावे हे शिकवते.

 

 

प्रत्येकाला जीवनात कुठल्या ना कुठल्या आजाराकरता किंवा रोगाकरिता औषध घ्यावे लागते, म्हणूनच औषधनिर्माणशास्त्र हे वैद्यकशास्त्र व रुग्ण यामधील महत्त्वाचा दुवा आहे. श्री नितीन जाधव हे शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ते सध्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालय, अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) च्या चेन्नई येथील समुद्री बंदर कार्यालयात ‘भारताचे सहाय्यक औषध नियंत्रक’ म्हणून नियुक्त आहेत. त्यांनी वर्ष २००० मध्ये आपले बी.फार्मसी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. डॉ सुनिल पांडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, कंपनीमध्ये कार्य करतांना विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी जेणे करून कंपनीव स्वतःचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.

 

 

कंपनीने दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्णतः करून उत्कृष्ट कार्य करावे. कंपनीमध्ये कशा पद्धतीने कार्य केले जाते याविषयी सखोल माहिती सांगितली. औषधनिर्माण क्षेत्रात प्रात्यक्षिकांना जास्त महत्त्व असते कारण की प्रत्यक्षात उपकरणे हाताळणे व विविध प्रकारचे औषधी बनवणे आणि त्यांचे मूल्यमापन करणे तसेच प्रात्यक्षिक केल्याने विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढत असते आणि त्यांना त्याबाबतीचे सखोल ज्ञान मिळत असते. म्हणून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात आपले ध्येय ठरवले तर ते गाठू शकतात.

 

 

 

 

डॉ सुनिल पांडे हे शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ते सध्या आरअँडडी, एनडीडीएस भारत सिरम अँड वॅक्सिनेशन लिमिटेड पुणे चे सहाय्यक उपाध्यक्ष असून त्यांनी वर्ष २००३ मध्ये औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथून आपले बी.फार्मसी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यावेळी २०० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे आजी – माजी विद्यार्थ्यांचा संवाद होऊन एक नवीन दिशा विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

 

 

 

या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ सुनीला पाटील यांनी केले तर आभार प्रा.डॉ. जवेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

मंडळाच्या विविध ज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थी ठीक ठिकाणी नोकरी करीत आहे. संस्थेतर्फे नेहमीच शैक्षणिक गुणात्मक विकासासाठी उपक्रम राबविले जातात. महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर देश व परदेशात अनेक नामांकित कंपनीमध्ये नोकरीला आहेत. माजी विद्यार्थी हेच महाविद्यालयाचे ब्रँड अंबेसेडर असतात. महाविद्यालयाच्या जडणघडणीत तसेच, वाटचालीत महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.
दीपकभाई पाटील (अध्यक्ष – पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा)

 

 

 

माजी विद्यार्थी हे संस्थेचे सर्वात मौल्यवान स्त्रोत आहेत. आमचे माजी विद्यार्थी जगभरात विविध पदांवर कार्यरत आहेत. माजी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळते. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे उद्दिष्ट माजी विद्यार्थ्यांमध्ये समुदायाची भावना वाढवणे, तसेच संस्थेच्या भावनेशी जोडले जाण्याच्या भावनेला पाठिंबा देणे हे आहे. या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा निमित्त माजी विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्या व ह्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संस्थेला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

प्रा.मकरंदभाई पाटील (समन्वयक – पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा)

 

 

 

■ आमच्या पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळातर्फे नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी व्यवस्थापन मंडळ प्रोत्साहन देत असते. विद्यार्थी हा महाविद्यालयाचा आरसा असतो, विद्यार्थ्यामध्ये महाविद्यालयाचे प्रतिबिंब प्रतिबिंबित होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीतून स्व-विकास आणि जन-विकास साधला पाहिजे. महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयातील विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतील.

डॉ एस.पी.पवार (प्राचार्य – पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा)

 

बातमी शेअर करा
Previous Post

अस्तंबा येथून काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांचा प्रचाराचा शुभारंभ

Next Post

साक्री तालुक्यातील प्रचार सभेतून शिंदे गटाच्या आ. मंजुळाताई गावित यांच्यासह डॉ. हिना गावित यांचाही काँग्रेसवर हल्लाबोल

Next Post
साक्री तालुक्यातील प्रचार सभेतून शिंदे गटाच्या आ. मंजुळाताई गावित यांच्यासह डॉ. हिना गावित यांचाही काँग्रेसवर हल्लाबोल

साक्री तालुक्यातील प्रचार सभेतून शिंदे गटाच्या आ. मंजुळाताई गावित यांच्यासह डॉ. हिना गावित यांचाही काँग्रेसवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे : डॉ. मित्ताली सेठी

पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे : डॉ. मित्ताली सेठी

May 9, 2025
अवकाळी’मुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करा; डॉ. विजयकुमार गावित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

अवकाळी’मुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करा; डॉ. विजयकुमार गावित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2025
बारा बलुतेदार समाजाने शिवसेनेशी जुळवून विकास साध्य करावा : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे

बारा बलुतेदार समाजाने शिवसेनेशी जुळवून विकास साध्य करावा : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे

May 9, 2025
नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

May 6, 2025
भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

May 6, 2025
श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

May 6, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group