Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार लोकसभेसाठी डॉ.हिना गावित व ॲड. गोवाल पाडवी मध्ये प्रमुख लढत, 11 उमेदवार रिंगणात

team by team
April 30, 2024
in राजकीय
0
नंदुरबार लोकसभेसाठी पहिल्या दिवशी ३० नामांकनांची विक्री

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभेसाठी उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी 5 उमेदवारांनी नामांकन मागे घेतल्याने 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल तरी मुख्य लढत भाजपाच्या डॉ.हिना गावित व काँग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी यांच्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले.

 

नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या १६ उमेदवारांपैकी अपक्ष अलीबाबा रशिद तडवी, ऍड.के.सी.पाडवी, गोपाळ सुरेश भंडारी, डोंगर जिभाऊ बहिरम, हेमलता कागडा पाडवी या पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने आता आनंदा सुकलाल कोळी (बसपा हत्ती)
ऍड.गोवाल कागडा पाडवी (कॉंग्रेस, पंजा),
डॉ.हीना विजयकुमार गावित (भाजपा, कमळ), श्रीमती निर्मला वसावे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया, ऑटो रिक्षा ),रविंद्र रणजीत वळवी (भारतीय आदिवासी पार्टी, हॉकी स्टीक बॉल), हेमंत मन्साराम कोळी (वंचित बहूजन आघाडी, प्रेशर कुकर ),गितांजली शशिकांत कोळी (अपक्ष, माईक),जालमसिंग सुतूम पवार (अपक्ष, ट्रक),दीपककुमार मधुकर शिरसाठ (अपक्ष, शिट्टी), रोहिदास गेमजी वळवी ( अपक्ष, बॅटरी टॉर्च)
सुशिलकुमार जहांगीर पावरा (अपक्ष, नागरीक) हे
११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.दरम्यान आज उमेदवारांना चिन्हही वाटप करण्यात आले.
अक्कलकुवा विधानसभेत १ हजार १९८, शहादा विधानसभेत १ हजार ५८६, नंदुरबार विधानसभेत १ हजार ८६४, नवापूर विधानसभेत १ हजार २८१, साक्री विधानसभेत २०९, शिरपूर विधानसभेत १०६ असे एकुण ६ हजार २४४ निवडणूक कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्याच्या ठिकाणीच मतदान करु शकणार आहेत.
दरम्यान नंदुरबार लोकसभेसाठी 11 उमेदवार मैदानात असले तरी मुख्य लढत भाजपाच्या डॉ.हिना गावित व काँग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी यांच्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले.

 

 

कर्तव्यावरच करता येणार कर्मचाऱ्यांना मतदान

यंदा प्रथमच मतदानासाठी नियुक्त असलेल्या कर्मचार्‍यांसाठी जे ज्या ठिकाणी कर्तव्यावर आहेत, त्याच ठिकाणी त्यांना मतदान करता येणार आहे. तसेच झोनल अधिकारी असतील त्यांना त्यांच्या क्षेत्रातील कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे. पोलीस विभागासाठीदेखील ही सुविधा आहे. परंतू मतदार संघाबाहेर ज्यांची डयुटी असेल त्यांना पोस्टल बॅलेट पेपरनेच मतदान करता येणार आहे. निवडणूक कर्तव्यार्थ प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजाविता यावा म्हणून निवडणूक कार्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे. निवडणूक कार्य प्रमाणपत्र मिळालेले कर्मचारी त्यांची ज्या मतदान केंद्रवार नियुक्ती करण्यात आलेली आहे तेथेच मतदानाचा हक्क बजावू शकतील.

बातमी शेअर करा
Previous Post

जोर मारणे स्पर्धेत प्रा.डॉ.गणेश पाटील, शिवराज बुवा, पवन चौधरी ठरले विजेते

Next Post

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर म्हसावद व खेतीया पोलिसांची सभा

Next Post
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर म्हसावद व खेतीया पोलिसांची सभा

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर म्हसावद व खेतीया पोलिसांची सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add