नंदुरबार l प्रतिनिधी
क्रीडा भारती नंदुरबार जिल्हा यांच्यावतीने व मोठा मारुती संस्थान यांच्या सहकार्याने स्व. हरिश्चंद्र कन्हैयालाल सोनार यांच्या स्मरणार्थ हनुमान जन्मोत्सवानिमित्त जोर मारणे स्पर्धेचे आयोजन मोठा मारुती संस्था हॉल नंदुरबार या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुष गटात प्रा.डॉ.गणेश पाटील, मोठ्या गटात शिवराज बुवा तर लहान गटात पवन चौधरी हे विजेते ठरले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन मोठा मारुती संस्थानचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक संजय सोनार, क्रीडा भारतीचे अध्यक्ष प्रकाश चौधरी, उपाध्यक्ष राजेश शहा, मंत्री श्रीराम मोडक, विलास जोशी महाराज, करण चव्हाण, क्रीडा शिक्षक डॉ.मयूर ठाकरे, पोलीस खेळाडू आनंदा मराठे, दादाभाई बुवा, प्रा.जितेंद्र माळी, डॉ.नरेंद्र पाटील, भास्कर मराठे, कल्याण पाटील आदी उपस्थित होते.
सदर सहभागी खेळाडूंनी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यावेळी प्रकाश चौधरी मार्गदर्शनात म्हणाले की, दैनंदिन जीवनात व्यायामातून पैलवानांना सुदृढ व निरोगी शरीर संपत्ती मिळत असते व यातूनच खरे पैलवान तयार होतात. यासाठी जोर मारणे स्पर्धेचे आयोजन करण्याचा संदेश क्रीडा भारतीच्यावतीने त्यांनी दिला. स्पर्धेला पंच म्हणून मनीष सनेर, भरत चौधरी, प्रशांत जोहरी, हेमचंद्र मराठे, भूषण माळी, आकाश माळी, प्रदीप माळी यांनी काम पाहिले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.गणेश पाटील यांनी तर आभार करण चव्हाण यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
लहान गट-शिवराज दादाभाई बुवा, साई कृष्णा चौधरी, ओम कृष्णा चौधरी, सिद्धार्थ राजेंद्र चौधरी, धीरज राजेश चौधरी, मोठा गट-पवन शरद चौधरी, निलेश अनिल खलाणे, प्रेम कैलास पाटील, मनीष नाना मिस्त्री, प्रफुल्ल योगेश पाटील, खुला गट-पुरुष-प्रा.डॉ.गणेश पंडीत पाटील, राहुल नेहरू अहिरे, नकुल राजेंद्र चौधरी, किरण राजेंद्र सूर्यवंशी, भटू रामचंद्र पाटील