नंदुरबार l प्रतिनिधी
येथील संत निरंकारी मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. त्यात १७ महिला तर ७८ पुरुषांनी रक्तदान केले.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील संत निरंकारी भवन येथे संत निरंकारी मंडळ व चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत सालाबदाप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाच्या धुळे- नंदुरबार विभागाचे प्रमुख हिरालाल खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योजक राम रघुवंशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पी डी निकुंभे , लखन बालानी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हिरालाल खैरनार यांनी सांगितले की संत निरंकारी मंडळामार्फत देशभरात सुमारे १३ लाख ३५ हजार रक्तदाते रक्तदान करीत असतात. सामाजिक बांधिलकी या नात्याने मंडळातर्फे विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन, रक्तदान शिबिर यासह विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. असे त्यांनी सांगितले. राम रघुवंशी यांनी मंडळाच्या उपक्रम व शिबिरात शुभेच्छा दिल्या.
रक्त संकलन करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुलोचना बागुल, रक्त संक्रमण अधिकारी डॉ रमा वाडीकर, रक्त केंद्र जिल्हा रुग्णालय रक्त संकलन पथक यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वीते साठी पी डी निकुंभे , सुनील बागुल, संतोष चव्हाण यांच्यासह मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.
संत निरंकारी मंडळातर्फे दरवर्षी देशभरात १३ लाखा च्या पुढे रक्तदाते रक्तदान करीत असतात.
तसेच शहरात गेल्या १४ वर्षापासून सुमारे १५०० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. यासह विविध सामाजिक उपक्रम मंडळामार्फत राबविण्यात येत असतात.