नंदुरबार l प्रतिनिधी
वावद ता. नंदुरबार येथे आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर व संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
तंत्रज्ञानाच्या काळात तणावग्रस्त अडचणीची व टीव्ही मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांना व्यवसायिक शिक्षण समवेत नैतिक मूल्य व सुसंस्काराची गरज आहे. व्यसनाधीनता, संताचे शिक्षण, धर्म ,संस्कृती, परंपरा ,आचार- विचार, आरोग्य, चारित्र्य हे सर्व प्रश्न सध्याच्या काळात अनुत्तरीत आहे .या प्रश्नाचे उत्तर संत वांग्मय मध्ये समाविष्ट समग्र ज्ञानातून मिळू शकेल ,हीच काळाची गरज ओळखून नव्या उदयनमुख उभरत्या पिढीला व समाजाला काळाची गरज आहे.
म्हणून भविष्यकालीन मानवी जीवन हे उदात्त व्यापक यशस्वी समृद्ध उज्वल घडविण्यासाठी अध्यात्मिक बाल संस्कार शिबिर व गुरुकुलाचे आयोजन २५ एप्रिल ते १५ मे २०२४ पर्यंत विभागीय संस्कार शिबिर तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथा आयोजित केली आहे.
शिबिराचे आयोजन भागवताचार्य ह. भ. प. ज्ञानेश्वर माळी यांनी केले आहे या संस्कार शिबिरात चौथी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून या अध्यात्मिक बाल संस्कार शिबिरात श्रीमद् भगवद्गीता सहिता (अध्याय नऊ, बारा, पंधरावा )वाचन व पठण, मृदंग तबला, गायन, हार्मोनियम, व्यायाम, योगा, भजन, हस्तकला, संगणक (प्राथमिक शिक्षण), संभाषण कौशल्य ,व्यासपीठ संधी व सादरीकरण तंत्र ,व्याख्याने शूरवीरा संतांचे चरित्र क्षेत्रभेट, इंग्रजी संवाद कौशल्य, हरिपाठ पावल्या शिकवणे इत्यादीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शिबिर काळात मार्गदर्शनासाठी येणारे कीर्तनकार व कलाकार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
बाल संस्कार शिबिराचा दैनंदिन कार्यक्रम
पहाटे पाच ते सहा योगासन .सहा ते सात सराव .सात ते आठ दैनंदिनकार्यक्रम. आठ ते नऊ वाजता नाश्ता.नऊ ते ११ टाळ, मृदंग व श्लोक गीता क्लास .११ ते १२ हरिपाठ पाठांतर. दुपारी बारा ते एक जेवण. दुपारी एक ते तीन विश्रांती.तीन ते चार शूरवीर संत चारित्र्य ,व्याख्यान. चार ते सहा कौशल्य, क्रीडा, बौद्धिक, व्यावसायिक मार्गदर्शन.
सायंकाळी सहा ते सात हरिपाठ. सात ते नऊ जेवण. रात्री नऊ ते ११ कीर्तन सोहळा हे आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर निवासी आहे येथे संगीतमय भागवत गीता आठ मे २०२४ ते १५ मे २०२४ कथेचे निरूपण ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज माळी हे करणार आहेत या बाल संस्कार शिबिर व श्रीमद् भगवद्गीता कथेत पंचकोशीतील नंदुरबार माळीवाडा, निंभेल, कंढरे ,मांजरे, बह्याने, भालेर, नगाव, ति सी, शिंदगव्हाण, अक्राळे ,वटबारे, काकरदे, विखरण, जून मोहिदे, नाशिंदे, हाटमोहिते, निमगुळ, भादवड, बलदाणे, शनिमांडळ, वडवद, भोणे, उमर्दे,रनाळे,घोटाणे,कोपर्ली,खोंडामळी, कलमाडी, न्याहली, खोरी आदी गावातील भजनी मंडळ व कलाकार वादक सहभागी होऊन विद्यार्थ्यांना बालसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.