Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी : हरिष भामरे

Mahesh Patil by Mahesh Patil
April 21, 2024
in आरोग्य
0
उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी : हरिष भामरे

नंदुरबार l प्रतिनिधी

उन्हाळी हंगामात व वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ होत असून उष्णतेची लाट निर्माण होत असून नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हरिष भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

वातावरणातील बदलामुळे विशेषतः उन्हाळी हंगामात वाढत्या तापमानामुळे मे महीन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून मोठ्या प्रमाणात तापमाणात वाढ होत असते. उष्णते चीलाट अथवा उष्माघाटाचा विचार करता सामान्य तापमानापेक्षा 4.5 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाची वाढ होणे उष्मतेची लाट आहे असे समजून होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. वातावरणातील तापमानासोबत हवेतील आद्रता जास्त असल्यास त्याठिकाणी उष्णतेच्या लाटेचे अधिक दुष्परिणाम जाणवतात या शिवाय काही भागात रात्रीच्या वेळी तापमान कमी न होता अधिक उष्ण राहत असल्याने हा भाग अतिसंवेदनशील व उष्माघात प्रवण बनतो. अशा परिस्थितीत मानवी शरीरावर उष्णतेचे जास्त परिणाम दिसून येतो. विशेषतः झोपडपट्टी मध्ये राहणारे, रस्त्या शेजारील अथवा फिरते विक्रेते, बस स्थानक, रेल्वे स्थानक, यात्रचे ठिकाणे, विविध धार्मिक स्थळे, विवाह सोहळे, बाजार समितीत काम करणारे, नियमित बाजार अथवा आठवडा बाजारातील विक्रेते येथे भेट देणारे वयोवृद्ध, लहान मुले, महिला यांच्यावर उष्णतेचे जास्त परिणाम दिसून येतो. यासाठी उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.

ष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी काय करावे ?*•

 

पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली तरीही दर अर्धा तासाच्या फरकाने पाणी प्यावे.

  1. • घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावे.
    • सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा,
    • उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
    • हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत.
    • उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपडयाने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
    • प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
    • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हें, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.
    • अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
    • गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
    • घर थंड ठेवण्यासाठी पड़दे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
    • पंखे, ओले कपड़े याचा वापर करण्यात यावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
    • कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
    • सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
    • पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.
    • गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
    •
    *उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी काय करु नये ?*
    • उन्हात अतिकष्टाची कामे करू नये.
    • मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये.
    • दुपारी 13 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
    • उच्य प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.
    • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
    • गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
    • बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
    • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.
बातमी शेअर करा
Previous Post

स्वतःच्या गावात साधा रस्ता बनवला नाही; ते निष्क्रिय नेते आज आमच्यावर खोटे आरोप करतात; डॉ. हिना गावितांचा

Next Post

आचारसंहितेमुळे जिल्हास्तरील लोकशाही दिन रद्द : मनीषा खत्री

Next Post
सिमी संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी : मनीषा खत्री

आचारसंहितेमुळे जिल्हास्तरील लोकशाही दिन रद्द : मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

May 6, 2025
भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

May 6, 2025
श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

May 6, 2025
‘कामे लटकावू नका, ताबडतोब मार्गी लावा’ डॉ. विजयकुमार गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

‘कामे लटकावू नका, ताबडतोब मार्गी लावा’ डॉ. विजयकुमार गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

April 28, 2025
भांडे संच वाटप पुन्हा सुरू होणार; माजी मंत्री आ.डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नोंदणीचा झाला शुभारंभ

भांडे संच वाटप पुन्हा सुरू होणार; माजी मंत्री आ.डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नोंदणीचा झाला शुभारंभ

April 28, 2025
चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात

चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात

April 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group