नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार – काँग्रेस उमेदवार ऍड. गोवाल पाडवी यांचे वडील ऍड. के. सी. पाडवी हे ३५ वर्षांपासून सत्तेत आहेत. एवढ्या कालावधीत त्यांना त्यांच्या गावाकडे जाणारा साधा रस्ताही करता आला नाही, तो रस्ता मी करून दिला. त्यांच्या मतदारसंघात अनेक गावे विजेअभावी अंधारात होती. तिथे माझ्या कार्यकाळात वीज पोहचवली.
अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधिकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर, आदिवासींना न्याय देणाऱ्या भारतीय जनता पार्टीवर आणि गावित परिवारावर आरोप केले जातात हे केवळ हस्यस्पदच वाटते; या शब्दात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी प्रहार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः वारंवार सांगत आहेत की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान परम पवित्र ते बदलवण्याचा मानस नाही, तरीही काँग्रेस वाल्यांना भाजप सरकारविरोधात मुद्देच नसल्यामुळे त्यांच्याकडून भजपा संविधान विरोधी असल्याचा अपप्रचार केला जात आहे. परंतु मोदींची गॅरंटी आहे की, भाजपच्या काळात संविधान पूर्णतः सुरक्षित होते, आहे आणि राहील; असेही प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी केले.
सध्या खासदार डॉक्टर हिना गावित यांचे शिरपूर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका मिळावे आणि कॉर्नर सभा घेणे सुरू आहे. या दरम्यान कोडीद येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी वरील शब्दात प्रहार केले. या प्रचार दौऱ्यात शिरपूरचे आमदार कांशीराम पावरा, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विधानसभा निवडणूक प्रमुख के. डी. पाटील, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, भाजपचे सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा, सरलाबाई पावरा, आरती पावरा, सुशिलाबाई पावरा, अनिता पावरा, रतन पावरा, नारायण पाक्रा आदी उपस्थित होते.
डॉ. हीना गावित यांनी मागील दोन दिवसापासून शिरपूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख गावांना भेटी देऊन कॉर्नर सभा घेणे चालू ठेवले आहे. दुर्गम आदिवासी भागासह ग्रामीण भागांना भेटी देत फत्तेपूर, कुळीदव अन्य 6 गावांना त्यांच्या कॉर्नर सभा 19 रोजी पार पडल्या. काही प्रमुख गावांमध्ये कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकीच्या कामाला जोमाने लागा; आवाहन देखील डॉक्टर हिना गावित यांनी केले. शिरपूर तालुक्यात २२ हजार पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून घरकुलांचा लाभ मिळवून दिला, पानंद रस्ते कॉंक्रिटीकरण आणि राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून मोठा रस्ते विकास केला, महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले, अशीही माहिती डॉ. हीना गावित यांनी याप्रसंगी दिली .
याप्रसंगी लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. तुषार रंघे यांनी सांगितले की, आपल्या आदिवासी भागात आपले तालुक्याचे भाग्यविधाते अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हिनाताई गावित यांनी केंद्र शासनाचा मोठ्घा प्रमाणावर निधी मंजूर करून गेल्या दहा वर्षात आदिवासी भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
म्हणून आपण न डगमगता भाजपालाच भरघोस मतांनी विजयी करावे. आमदार काशीराम पावरा, शिरपूर शिसाकाचे संचालक जयवंत पाडवी, शिरपूर पंचायत समितीचे माजी सभापती सत्तारसिंग पावरा, पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंघे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व मतदारांना भाजपाच्या डॉक्टर हिनाताई गावित यांना मोठ्या मताधिकार्यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.