नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार व शहादा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतींच्या 1 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 या कालावधीसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका व या कालावधीत गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीस प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
नंदुरबार तालुका-
जुनमोहिदा-अनुसूचित जाती स्त्री, बह्याणे-नागरिकांचा मागास प्रवर्ग, सैताणे- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, समशेरपूर, बोराळे व नाशिंदे-सर्वसाधारण, बलवंड, कलमाडी व होळ तर्फे रनाळा- सर्वसाधारण स्त्री.
शहादा तालुका-
ससदे- नागरिकांचा मागास प्रवर्ग, शिरुड दिगर- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, अनरद व देऊर-कामखेडा- सर्वसाधारण, सावळदा व वरुळ त.श.-सर्वसाधारण स्त्री.