तळोदा l प्रतिनिधी
आजाराला कंटाळून तळोदा तालुक्यातील बोरद येथील ३० वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली याप्रकरणी तळोदा पोलिसात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरद ता.तळोदा येथील महिला ज्योती राजेंद्र पाटील (वय ३०) या नेहमी आजारी राहत होत्या त्यामुळे त्यांनी आजारास कंटाळून शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पती राजेंद्र अरुण पाटील वय 33 रा.बोरद यांनी तळोदा पोलिस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस नाईक विजय विसावे हे करीत आहे.