नंदुरबार l प्रतिनिधी
महायुतीच्या उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महा संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या समवेत उपस्थित होते.
14 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र अत्यंत जल्लोषात साजरी केली जात असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या जल्लोषात आणि त्या आनंदात महा संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सुद्धा सहभाग घेऊन नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या.
यात सर्वप्रथम सकाळी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या समवेत जाऊन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी डॉक्टर आंबेडकर पुतळ्याला भेट दिली.
उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले व उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी संवाद केला. सगळ्या वंचित घटकांना समावेत घेऊन राज्याची प्रगती साधायची आहे. कोणताही समाज घटक शासकीय योजनांपासून वंचित राहू नये आणि प्रत्येक घटक प्रगतीपथावर यावा, यासाठी दक्ष असल्याचे याप्रसंगी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले.