नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील उत्पादिन होणारा चारा, वन विभागातील उपलब्ध चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर अन्यत्र वाहतुकीस बंदी घालण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उ. दे. पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात चालू वर्षी सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने भविष्यात टंचाई सदृष्य काळात चारा टंचाई उद्भवू शकते व जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात उद्भवणाऱ्या चारा टंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील पिक पेऱ्याच्या आधारे उत्पादित होणारा चारा, वन विभागातील उपलब्ध चारा, जिल्ह्यातील उद्योगांतून निर्माण होणारे मुरघास आणि टोटल मिक्स रेशन याची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली असून जिल्ह्याबाहेरील निविदाधारकांनास लिलाव देण्यात येवू नये, जेणेकरुन जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही, असेही श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.